Magel Tyala Valu: मागेल त्याला घरपोहच वाळू, अशी करा ऑनलाईन नोंदणी, 1 हजार रुपयांमध्ये 1 ब्रास वाळू मिळणार

By Bhimraj Pikwane

Published on:

Magel Tyala Valu

Magel Tyala Valu: राज्य सरकारने वाळू संबंधित एक नवीन धोरण आखले आहे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी दिलेल्या माहितीनुसार आता राज्यामध्ये ऑनलाईन नोंदणी करून घरपोच वाळू पुरवठा दिला जाणार आहे.

राज्यामधील वाळू आणि गौण खनिज बाबत नवे धोरण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे त्यानुसार नागरिकांना आता फक्त एक हजार रुपयांमध्ये एक ब्रास वाळू (Gharpoch valu yojna 2023) मिळणार आहे. राज्य शासनाच्या या नवीन धोरणामुळे व्यवसायामधील एजंट गिरी थांबून सरकारच आता लोकांना वाळू देणार असल्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणामध्ये पैसे वाचणार आहेत. या राज्य शासनाच्या नवीन धोरणामुळे वाळू तस्कर पूर्णपणे हद्दपार होईल असा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. लोणी बुद्रुक येथे परंपरेनुसार गुढीपाडव्यानिमित्त ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते.

राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर महसूल मंत्रीपदी विखे पाटील यांना मिळाले यामध्ये त्यांनी या संबंधित नवीन धोरण आखण्याचे ठरविले होते. हे चित्र बदलण्यासाठी नवे धोरण आखण्याची घोषणा मंत्री विखे पाटील यांनी केली आणि त्याचे कामही अंतिम टप्प्यामध्ये आले आहे.

1 एप्रिल 2023 पासून मिळणार Magel Tyala Valu

सुजय विखे पाटील एबीपी माझाच्या रिपोर्ट नुसार पुढे म्हणाले की मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या महसूल मंत्री यांनी निर्णय घेतला 1 एप्रिल पासून महाराष्ट्र मधील प्रत्येक गरिबाला 1 हजार रुपये ब्रासने वाळू मिळेल. ( 1000rs, 1 bras valu) कोणाच्या पाय पडण्याची गरज नाही तुम्ही ऑनलाईन द्वारे माहिती भरा वाळू तुमच्या घरपोच येईल. हा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. ही वाळू तस्करी संपली पाहिजे आपल्या महिला सुरक्षित राहण्यासाठी, राज्याच्या पुढील भविष्यासाठी वाळू तस्करी संपली पाहिजे.

Magel Tyala Valu वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत यासंबंधीचे धोरण तयार करण्यात आले आहे. विरोधकांकडून यासंबंधी प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. मधल्या काळात वाळू लिलाव बंद झाल्याने कामे ठप्प झाल्याचा आरोप करण्यात आला. आता हे धोरण अंतिम झाले आहे. सध्या सुरू असलेल्या अधिवेशनातच ते जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. यातून नागरिकांना केवळ 1 हजार रुपये ब्रास या भावाने वाळू दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत.

Magel Tyala Valu: मागेल त्याला घरपोहच वाळू, अशी करा ऑनलाईन नोंदणी, 1 हजार रुपयांमध्ये 1 ब्रास वाळू मिळणार
Magel Tyala Valu Nirnay Video
Magel Tyala Valu
Magel Tyala Valu: मागेल त्याला घरपोहच वाळू, अशी करा ऑनलाईन नोंदणी, 1 हजार रुपयांमध्ये 1 ब्रास वाळू मिळणार

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

1 thought on “Magel Tyala Valu: मागेल त्याला घरपोहच वाळू, अशी करा ऑनलाईन नोंदणी, 1 हजार रुपयांमध्ये 1 ब्रास वाळू मिळणार”

Leave a Comment