Mahadiscom Solar: मुख्यमंत्री सौर पंप योजने अंतर्गत प्रलंबित शेतकऱ्यांना सोलर पंप जोडणीसाठी नवीन अर्ज सुरू | Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana

By Bhimraj Pikwane

Published on:

Mahadiscom Solar

mahadiscom solar मुख्यमंत्री सोलार पंप योजना अर्थात महावितरण च्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या कृषी सोलर पंप जोडणी संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट आहे.

राज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना विजेची जोडणी झालेली नाही म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी कोटेशन भरलेले आहे परंतु अद्याप देखील त्यांना विजेची जोडणी झाली नाही अशा शेतकऱ्यांना 1 लाख सोलर पंप देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने (Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana) अंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे. महावितरणच्या (mahadiscom solar) माध्यमातून विजेची जोडणी प्रलंबित असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या विजेच्या कनेक्शन ऐवजी सोलर पंप दिले जाणार आहेत. शेतकऱ्यांमार्फत इच्छा प्रकट केल्यानंतर महावितरण मार्फत त्यांना सोलर पंप देण्यात येणार आहे.

ज्या शेतकऱ्यांनी आपले कोटेशन भरले आहे व ज्या शेतकऱ्यांनी आपले डिमांड भरले आहे. अशा कोटेशन व डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना महावितरणच्या माध्यमातून मेसेज येत आहेत की, आपला ग्राहक क्रमांक ***** करिता प्रलंबित कृषी पंप विद्युत जोडणी ऐवजी लाभार्थी हिस्सापोटी अतिरिक्त रकमेचा भरणा करून पारेषण विरहित सौर कृषी पंप ( Mahadiscom Solar ) प्रस्थापित करण्यास आपण इच्छुक असल्यास आपली नोंदणी मेसेज मध्ये दिलेल्या लिंक मध्ये करू शकता.

त्याच्या संदर्भात महावितरणच्या संकेतस्थळावरती एक लिंक सुद्धा देण्यात आलेली आहे. महावितरणच्या संकेतस्थळावर गेल्या वर डाव्या बाजूला आपल्याला एक लिंक दिसेल पैसे भरून कृषी पंप प्रतीक्षा यादी मध्ये प्रलंबित ग्राहकांनी कृषी पंप विद्युत जोडणी ऐवजी सौर कृषी पंप घेण्यात संमती देण्यासाठी येथे क्लिक करावे. अशा पद्धतीची लिंक देण्यात आलेली आहे ती खालीलप्रमाणे असेल.

Mahadiscom Solar: मुख्यमंत्री सौर पंप योजने अंतर्गत प्रलंबित शेतकऱ्यांना सोलर पंप जोडणीसाठी नवीन अर्ज सुरू | Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana
Mahadiscom Solar

Mahadiscom Solar या लिंक च्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ( Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana) किंवा महावितरण च्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सोलर पंपासाठी इच्छुक आहेत म्हणून आपली नोंदणी या लिंक द्वारे करू शकता. मित्रांनो या वेबसाईटची लिंक आपण महावितरण च्या वेबसाईटवर पाहू शकता किंवा याची डायरेक्ट लिंक पुढील प्रमाणे https://wss.mahadiscom.in/wss/wss_AG_PP_Consent.aspx
किंवा आपण जर प्रलंबित ग्राहक असाल आणि महावितरण च्या माध्यमातून आपल्याला मेसेज प्राप्त झाला असेल तर मेसेज मधील लिंक मध्ये क्लिक करून आपण डायरेक्ट लिंक ओपन करू शकता. या लिंक वरती क्लिक केल्यानंतर एक पेज खुलेल ज्यामध्ये आपल्याला ग्राहक क्रमांक विचारला जाईल तो ग्राहक क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे.

Mahadiscom Solar साठी अर्ज कसा करावा ?

  • ज्यावेळेस आपण नवीन कोटेशन किंवा डिमांड भरलेला आहे त्या अर्जावरती आपल्याला जो अप्लीकेशन नंबर किंवा ग्राहक क्रमांक मिळाला असेल तो ग्राहक क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे.
  • ग्राहक क्रमांक टाकल्यानंतर नोंदणी करा या पर्यावरण क्लिक करायचे आहे.
  • नोंदणी करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक अर्ज ओपन होईल.
  • या अर्जामध्ये शेतकऱ्यांची माहिती यामध्ये दाखवली जाईल. शेतकऱ्याचे नाव यामध्ये दाखवले जाईल.
  • या अर्जामध्ये आपल्याला मुख्यमंत्री सोलार पंप योजनेसाठी इच्छुक आहात का असे विचारले जाईल.
    याच्यामध्ये तुम्हाला होय किंवा नाही यामध्ये उत्तर द्यायचे आहे.
  • यामध्ये आपल्याला होय करायचे आहे हे केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठवला जाईल आणि आपले व्हेरिफिकेशन केले जाईल.
  • आपल्या मोबाईल नंबर वर ओटीपी आल्यानंतर आपले व्हेरिफिकेशन व नोंदणी या ठिकाणी पूर्ण होईल.

mahadiscom solar आपण सोलर पंप योजनेसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आहात म्हणून आपली नोंदणी केली जाईल. जर ही नोंदणी करतेवेळी आपण जर सोलर पंप घेण्यासाठी इच्छुक नाही या पर्यायावर ती क्लिक केले तर आपण सोलर पंप साठी इच्छुक नाही म्हणून ग्राह्य धरले जाईल आणि कनेक्शन साठीची पुढील प्रोसेस केली जाईल. जर आपण या पर्यायांमध्ये होय केले तर सोलर पंप देण्यासाठी पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल. हि नोंदणी करते वेळेस आपण डिमांड किंवा कोटेशन भरताना भरणा केलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त मुख्यमंत्री सौर कृषी पंप घेण्यासाठी अतिरिक्त रक्कम भरणा घेतला जाईल. ज्याप्रमाणे सोलर पंप दिले जातात त्याचप्रमाणे आपल्याला सोलर पंप उभारणी दिली जाईल.

Mahadiscom Solar: मुख्यमंत्री सौर पंप योजने अंतर्गत प्रलंबित शेतकऱ्यांना सोलर पंप जोडणीसाठी नवीन अर्ज सुरू | Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana

तर मित्रांनो बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांकडून विचारणा केली जात होती की विजेचे कनेक्शन प्रलंबित असणाऱ्या शेतकऱ्यांना कधीपर्यंत सोलर पंप दिले जाणार आहेत. तर आता त्यासाठी सुरुवात झालेली आहे. लवकरच कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत नवीन अर्ज व नवीन कोठा उपलब्ध होणार आहे. कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत खूप मोठा कोठा लवकरच येणार आहे यासाठी अर्थसंकल्प 2023-24 मध्ये ही बजेट देण्यात आलेली आहे. चालू वर्षांमध्ये दीड लाख सोलार पंप देण्याचे उद्दिष्ट केलेले आहे.

तर मित्रांनो अशा पद्धतीचे एक महत्त्वाचे अपडेट होते जे नक्की आपल्याला उपयोगी पडेल.

Mahadiscom Solar: मुख्यमंत्री सौर पंप योजने अंतर्गत प्रलंबित शेतकऱ्यांना सोलर पंप जोडणीसाठी नवीन अर्ज सुरू | Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Leave a Comment