Maharashtra Budget 2023: शिंदे फडणविस सरकारच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी व सर्वसामन्यांसाठी काय मिळणार? वाचा सविस्तर

Maharashtra Budget काल दिनांक 9 मार्च 2023 रोजी अर्थमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला पहिला अर्थसंकल्प 2023 24 मांडला. अर्थसंकल्पामध्ये शेतकरी महिला आणि विद्यार्थ्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये बजेट सादर करण्यात आले. बजेटमध्ये सर्वसामान्य साठी नेमकं काय? या विषयी सविस्तर माहिती आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. शेतकरी महिला आणि सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा घोषणा कालच्या अर्थसंकल्पामध्ये Maharashtra Budget मांडले आहे. यातून केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना सहा रुपये वर्षाला मिळायचे यामध्येच आता शिंदे आणि फडणवीस सरकारनेही सहा हजाराची भर घातलेली आहे.

शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात Maharashtra Budget काय घोषणा सादर केल्या.

  • केंद्र सरकारचे 6000 आणि राज्य सरकारच्या मिळून शेतकऱ्यांसाठी वर्षाला अतिरिक्त सहा हजार रुपये मिळणार.
  • शेतकऱ्यांचा पिक विमा आता राज्य सरकार भरणार.
  • एक रुपया मध्ये शेतकऱ्यांना आता पिक विमा भरता येणार.
  • शेतकऱ्यांच्या नुकसानाचे ही पंचनामे करणार.
  • आता मागेल त्याला शेततळे फळबाग ठिबक सिंचन साठी एक हजार कोटी निधी मंजूर.
  • दान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी पंधरा हजार रुपयाची मदत देणार
  • दोनशे कोटी रुपयांच्या भांडवलासह कोकणासाठी काजू बोर्ड.
  • मागेल त्याला शेडनेट हरितगृह आधुनिक पेरणी यंत्र कॉटन श्रेडर.
  • चंदगड कोकण आणि आजरा इथं काजू फळ विकास योजना राबवली जाणार.
  • गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अनुदान आता राज्य सरकार राबवणार
  • तीन वर्षात पंचवीस लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेती खाली राज्य सरकार आणणार.
  • अपघात ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आता या अर्थसंकल्पात दोन लाख रुपयापर्यंत लाभ घोषित.
  • नागपुरात कृषी सुविधा केंद्र बुलढाणा मध्ये संत्रा प्रक्रिया प्रकल्प राबविण्यात येणार
  • तीन वर्षांत पंचवीस लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेती खाली आणणार
  • नागपूर मध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय व आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करणार.

Maharashtra Budget विद्यार्थ्यांसाठीही महत्त्वाच्या घोषणा

देवेंद्र फडणवीस बजेट Maharashtra Budget मधून विद्यार्थ्यांना चांगले खुश केलेले आहे. आता विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत मोठी वाढ केलेली आहे. तर महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत दिली जाणार आहे.

Maharashtra Budget 2023: शिंदे फडणविस सरकारच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी व सर्वसामन्यांसाठी काय मिळणार? वाचा सविस्तर

Namo Shetkari Yojana 2023: शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता वर्षाकाठी 6 नव्हे, तर मिळणार 12 हजार रुपये, पहा काय आहे योजना

सर्वसामान्यांसाठी या अर्थसंकल्पात Maharashtra Budget काय घोषणा केल्या?

  • पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना एक हजारावरून पाच हजार तसेच आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना पंधराशे वरून सात हजार पाचशे रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार.
  • प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांचे मानधन सहा हजारावरून 16000 करणार
  • माध्यमिक शिक्षक यांचे मानधन आठ हजारावरून अठरा हजार करणार.
  • उच्च माध्यमिक शिक्षकांचे मानधन नऊ हजारावरून वीस हजार रुपये करणार.
  • मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना आता नवीन स्वरूपामध्ये राबविली जाणार.
  • पिवळ्या केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबांना मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये व मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर 75 हजार रुपये मिळणार.
  • महिलांना एसटीच्या प्रवासामध्ये सरसकट पन्नास टक्के सवलत दिली जाणार.
  • आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरून पाच हजार रुपये.
  • अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरून दहा हजार रुपये
  • संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजने करता एक हजार रुपये वरून आता पंधराशे रुपये मासिक हप्ता दिला जाणार
  • महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पाच लाखापर्यंत मोफत उपचार घेता येणार.
  • मोदी आवास घरकुल योजना अंतर्गत इतर मागासवर्गीयांसाठी तीन वर्षांमध्ये दहा लाख घर उभारणार
  • महाराष्ट्रामध्ये 14 ठिकाणी मेडिकल कॉलेज स्थापन होणार
  • जनजीवन मिशन अंतर्गत नळ जोडणी व स्वच्छतेसाठी वीस हजार कोटी जाहीर.
  • रस्ते आणि फुलांसाठी 14 हजार 225 कोटी रुपये मंजूर.
  • मुंबईमध्ये आणखीन पन्नास किलोमीटर मेट्रोचे जाळे वाढविण्यात येणार.
  • मुंबईत मेट्रो दहा साठी ४४७६ कोटी तर मुंबई मेट्रो 11 साठी 8739 कोटी निधी जाहीर
  • नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सहा हजार सातशे आठ कोटीचा निधी जाहीर
Maharashtra Budget 2023: शिंदे फडणविस सरकारच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी व सर्वसामन्यांसाठी काय मिळणार? वाचा सविस्तर

1 thought on “Maharashtra Budget 2023: शिंदे फडणविस सरकारच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी व सर्वसामन्यांसाठी काय मिळणार? वाचा सविस्तर”

Leave a Comment