मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधीला एप्रिलमध्ये 79 लाख शेतकऱ्यांना 1600 कोटींचा पहिला हप्ता मिळणार, पहा नियम अटी!

मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधीला एप्रिलमध्ये 79 लाख शेतकऱ्यांना 1600 कोटींचा पहिला हप्ता मिळणार, पहा नियम अटी!

मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधी: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ( Pm Kisan Yojana) योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री सन्मान निधी योजना (namo shetkari yojana) घोषणा अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये झाली. त्यानुसार त्यावरती कारवाई देखील सुरू आहे एप्रिल नंतर राज्यांमधील 79 लाख 27 हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे 1600 कोटी रुपये दिले जाणार आहेत.

मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना नियम अटी

 • 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी ज्यांच्या नावावर जमीन आहे त्यांना त्या योजनेचा लाभ मिळणार आहे.
 • मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा (mukhymntri kisan samman yojna) लाभ नवीन आर्थिक वर्षापासून दिला जाणार आहे.
 • एका सातबारा वरती कुटुंबप्रमुख त्यांची पत्नी व 18 वर्षाखालील 2 आपत्ती असे कुटुंब ग्राह्य धरून त्या कुटुंबांना प्रत्येकी 2 हजार रुपये मिळणार आहेत.
 • वर्षातून तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे वार्षिक सहा हजार रुपये वितरित केले जाणार.

 • केंद्र सरकारच्या योजनेचे निकष मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी लागू असणार आहेत.
  म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेसाठी जे नियम व अटी आहेत तेच नियम मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी असणार आहेत.
 • योजनेसाठी पात्र राहण्यासाठी क्षेत्राची कोणतीही अट नाही. फक्त जमीन ही लागवडी योग्य असावी.
 • ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीची आहे. परंतु त्यांनी आपले बँक खात्याला आधार लिंक केले नाही. तसेच त्यांच्या नावावरील एकूण मालमत्तेची माहिती महसूल विभागाला दिली नाही त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

 • या योजनेसाठी काही ठराविक दिवसाची मुदत दिली जाणार आहे. त्यामध्ये प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेची गरज नाही असे ग्राह्य धरून त्यांना अपात्र केले जाणार आहे.
 • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना वितरित झाल्यानंतर पुढील 10 ते 15 दिवसाचे राज्याचा हप्ता म्हणजेच मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होईल.
मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधीला एप्रिलमध्ये 79 लाख शेतकऱ्यांना 1600 कोटींचा पहिला हप्ता मिळणार, पहा नियम अटी!

Namo Shetkari Yojana 2023: शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता वर्षाकाठी 6 नव्हे, तर मिळणार 12 हजार रुपये, पहा काय आहे योजना

फक्त या शेतकऱ्यांनाच मिळणार लाभ

 • बँक खात्याला आधार लिंक केलेले शेतकरी.
 • प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत ही केवायसी केलेले शेतकरी पात्र राहणार.
 • लाभार्थीच्या नावावरील सर्व मालमत्तेची माहिती दिल्यानंतरच त्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार.

या 36 लाख शेतकऱ्यांना मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ नाही

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत महाराष्ट्र मधील 1 कोटी 15 लाख शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळाला परंतु त्यानंतर आधार लिंक, केवायसी व आपल्या जमिनीची माहिती न दिल्याने तब्बल 36 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणे बंद झाला आहे. सध्या 79 लाख शेतकऱ्यांनाच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे. आता पुढील 14 वा हप्ता सुद्धा जे पात्र शेतकरी आहेत तेवढ्यांना लाभार्थींना लाभ मिळणार आहे.

मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधीला एप्रिलमध्ये 79 लाख शेतकऱ्यांना 1600 कोटींचा पहिला हप्ता मिळणार, पहा नियम अटी!

Leave a Comment