Onion Subsidy: कांदा अनुदानासाठी या तारखेपर्यंत येथे करा अर्ज, जाणून घ्या सविस्तर माहिती |onion subsidy in maharashtra

By Bhimraj Pikwane

Published on:

Onion Subsidy

Onion Subsidy: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वर्ष 2022-23 या वर्षाकरिता 350 रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. कांदा अनुदान साठी दिनांक 3 एप्रिल 2023 ते 20 एप्रिल 2023 पर्यंत आपले अर्ज सादर करावे असे पणन संचालक यांनी आवाहन केले आहे.

राज्यामधील कृषी उत्पन्न बाजार समिती त्यामध्ये व खाजगी बाजार समितीमध्ये थेट पणन अनुज्ञप्ती धारकाकडे अथवा नाफेड कडे विक्री केलेल्या शेतकऱ्यांना हे 350 रुपये प्रति क्विंटल अनुदान व जास्तीत जास्त 200 क्विंटल च्या मर्यादेमध्ये मंजूर करण्यात आली आहे. राज्यामधील शेतकऱ्यांनी 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये कांदा विक्री केलेला असावा.

तरी राज्यांमधील शेतकरी बांधवांनी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा अनुदान मिळण्यासाठी आपला अर्ज विहित नमुन्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती खाजगी बाजार समिती थेट पणन परवानाधारक नाफेड खरेदी-विक्री केंद्र तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयामध्ये विनामूल्य अर्ज उपलब्ध आहे त्या ठिकाणी सादर करावेत.

कांदा अनुदान अर्जासोबत जोडायची कागदपत्र

  • कांदा विक्री केलेली पावती
  • कांदा पिकाची नोंद असलेला 7/12
  • बँक पासबुक
  • आधार कार्ड
  • जर आपला सातबारा वडिलांच्या नावे व कांदा विक्री पावती मुलाच्या किंवा कुटुंबांमधील अन्य व्यक्तीच्या नावे असेल तर त्यासोबत एक सहमती पत्र जोडणे.

आपला अर्ज ज्या ठिकाणी कांदा विक्री केला आहे त्या कृषी उत्पन्न बाजार समिती थेट पणन अनुज्ञप्ती धारक खाजगी बाजार नाफेड खरेदी केंद्र मधील प्रमुखाकडे 20 एप्रिल 2023 अगोदर सादर करावेत.


Onion Subsidy: कांदा अनुदानासाठी अटी

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 रुपये प्रतिक्विंटल आणि जास्तीत जास्त 200 क्विंटल च्या मर्यादेमध्ये अनुदान देण्यात येणार आहे. ज्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी खरीप हंगामा मधील लाल कांदा दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2013 कालावधीमध्ये संबंधित कृषी उत्पन्न बाजार समिती खाजगी बाजार समितीमध्ये व पणन अनुज्ञप्ती धारकाकडे किंवा नाफेड करून लेट खरीप कांदा खरेदी करता उघडण्यात आलेल्या खरेदी केंद्रामध्ये विक्री केला असेल अशा शेतकऱ्यांना या कांदा अनुदानाचा लाभ घेता येणार आहे.

Onion Subsidy: कांदा अनुदानासाठी या तारखेपर्यंत येथे करा अर्ज, जाणून घ्या सविस्तर माहिती |onion subsidy in maharashtra

Onion Subsidy: हे शेतकरी होणार कांदा अनुदानास पात्र, अनुदानासाठी अर्ज कसा करावा? नवीन शासन निर्णय जाहीर

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वगळता (onion subsidy in maharashtra) राज्यामध्ये सर्व बाजार समिती मध्ये हे कांदा अनुदान योजना राबविण्यात येणार आहे. अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बचत खात्यामध्ये डीबीटी द्वारे ट्रान्सफर करण्यात येणार आहे.

येथे करा अर्ज

कांदा अनुदान (Onion Subsidy) योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कांदा विक्री केलेली पावती आपला 7/12 उतारा यावर कांद्याची नोंद असलेला, आपले बँक पासबुक सोबत घेऊन आपण ज्या ठिकाणी आपला कांदा विक्री केलेला आहे त्या ठिकाणी आपला अर्ज 20 एप्रिल 2023 अगोदर सादर करावा.

Onion Subsidy: कांदा अनुदानासाठी या तारखेपर्यंत येथे करा अर्ज, जाणून घ्या सविस्तर माहिती |onion subsidy in maharashtra

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

2 thoughts on “Onion Subsidy: कांदा अनुदानासाठी या तारखेपर्यंत येथे करा अर्ज, जाणून घ्या सविस्तर माहिती |onion subsidy in maharashtra”

Leave a Comment