Onion Subsidy: हे शेतकरी होणार कांदा अनुदानास पात्र, अनुदानासाठी अर्ज कसा करावा? नवीन शासन निर्णय जाहीर

By Bhimraj Pikwane

Published on:

Onion Subsidy
Onion Subsidy: हे शेतकरी होणार कांदा अनुदानास पात्र, अनुदानासाठी अर्ज कसा करावा? नवीन शासन निर्णय जाहीर

Onion Subsidy: नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति क्विंटल अनुदान राज्यांमधील शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेले आहे. त्याच्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी देखील मिळाली होती आणि शासनाने देखील यासाठी मंजुरी दिली होती. परंतु अद्याप देखील याचा शासन निर्णय जाहीर झालेला नव्हता त्यामुळे कोणते शेतकरी यासाठी पात्र होतील याची शेतकऱ्यांना अशा लागली होती. Onion Subsidy

Onion Rate: परंतु मित्रांनो अखेर आज 27 फेब्रुवारी 2023 रोजी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 रुपये एवढे अनुदान (Onion Subsidy) देण्यासाठी शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयांतर्गत कोणते शेतकरी यासाठी पात्र होतील व कोणत्या बाजार समिती यासाठी पात्र राहतील तसेच कोणत्या कालावधी मधील शेतकरी पात्र होतील. अर्ज कसा करायचा कागदपत्रे काय लागतील या सर्वांविषयी सविस्तर अशी माहिती आपण आजच्या या टॉपिक मध्ये पाहणार आहोत.

Onion Market: 9 मार्च 2023 राज्य शासनाच्या माध्यमातून सादर करण्यात आला होता. त्या अहवालामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 रुपये प्रतिक्विंटल एवढे अनुदान द्यावे असे त्या अहवालामध्ये सादर करण्यात आले होते. याच अनुषंगाने आज 27 मार्च 2023 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्या शासन निर्णयामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काही अटी आणि शर्ती देण्यात आलेले आहे त्या पाहुयात.

अनुदानासाठी असा करा अर्ज

Onion Subsidy: ज्या शेतकऱ्यांनी 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या 2 महिन्यातील काळात कांदा विकला त्यांनाच अनुदान मिळणार आहे. तसचं फक्त लाल कांद्यासाठीचे हे अनुदान असेल. अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. कांदा अनुदानासाठी शेतकऱ्यांनी कांदा विक्री पावती, सात बारा उतार आणि बॅंक खात्याच्या माहितीसह ज्या बाजार समितीत कांदा विक्री केला त्या बाजार समितीत अर्ज करावा. शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त करुन देण्याचे प्रस्ताव संबंधित बाजार समिती तयार करणार आहे.

Onion Subsidy: अटी व शर्ती खालील प्रमाणे

 • कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये 350 प्रति क्विंटल व जास्तीत जास्त 200 रुपये प्रति क्विंटल शेतकरी याप्रमाणे अनुदान (Onion Subsidy Approved) मंजूर करण्यात आले आहे.
 • जे शेतकरी लेट खरीप हंगामातील लाल कांदा दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते दिनांक 31 मार्च 2023 या कालावधी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समिती खासगी बाजार समितीमध्ये तसेच थेट पणन अनुज्ञप्तीधारकाकडे अथवा नाफेड कडून लेट खरीप कांदा खरेदी करता उघडण्यात आलेल्या खरेदी केंद्रामध्ये विक्री करतील यांच्यासाठी ही योजना लागू राहील.

 • मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, मुंबई वगळता राज्यातील सर्व बाजार समित्यांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे.
 • परराज्यातून आवक झालेल्या व व्यापाऱ्यांच्या कांद्यासाठी ही योजना लागू राहणार नाही.
 • सदर अनुदान थेट बँक हसतारण म्हणजेच डायरेक्ट बँक ट्रान्सफर द्वारे शेतकऱ्यांच्या सेविंग बँक खात्यामध्ये जमा केले जाईल.

 • सदर अनुदान हे आयसीआयसीआय बँक मार्फत अदा करण्यात येणार आहे.
 • कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेखाली अनुदान मिळवण्यासाठी कांदा विक्री पट्टी व विक्री पावती, 7/12 उतारा, आपले बँक बचत खाते क्रमांक इत्यादी कागदपत्र सह साध्या कागदावर ज्या बाजार समितीकडे कांद्याची विक्री केलेली आहे तेथे आपला अर्ज करावा.
 • शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त करून देण्याचे प्रस्ताव हे संबंधित बाजार समितीने तयार करावेत.
 • प्रस्ताव तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी बाजार समितीची राहील सदरचे प्रस्ताव तालुका सहाय्यक निबंध यांनी तपासून ते जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे सादर करावेत.

 • जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी योग्य प्रस्तावना मंजुरी दिल्यानंतर ती यादी पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना मान्यतेसाठी सादर करावी. त्यांनी ती यादी तपासून अंतिम केलेल्या यादीत पणन विभागामार्फत थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वितरित करण्यात येईल.
 • या योजनेची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव, तालुका सहाय्यक व उपनिबंधक व जिल्हा उपनिबंधक हे या योजनेचे लाभार्थी अंतिम करण्यासाठी नियंत्रक म्हणून कामकाज पाहतील व त्यांच्यासाठी ते जबाबदार राहतील.

ज्या प्रकरणात 7/12 उतारा वडिलांच्या नावे व विक्री पट्टी मुलांच्या व अन्य कुटुंबीयांच्या नावे आहे व 7/12 उतारा वर पीक पाहणी नोंद आहे. अशा प्रकरणात वडील व मुलगा व अन्य कुटुंबीय यांनी सहमतीने वरती नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही केल्यानंतर 7/12 उतारा ज्यांच्या नावे असेल त्यांच्या बँक बचत खात्यामध्ये अनुदान जमा केले जाईल.
या योजनेअंतर्गत ताप प्राप्त होणाऱ्या सर्व प्रस्तावाची छाननी करून जिल्हा न्याय पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्याची कारवाही पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी त्वरित करावी व बाजार समिती निहाय (Onion Subsidy List) लाभार्थी व अनुद्य अनुदान यांची एकत्रित माहिती शासनास 30 दिवसाच्या आत सादर करावी. या योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची कारवाई स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे.

तर शेतकरी बांधवांनो 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये आपल्या कांद्याची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना सर्व बाजार समित्या मधील शेतकऱ्यांना 350 रुपये प्रतिक्विंटल अनुदान दिले जाणार आहे. याचीच मंजुरी ही आज 27 मार्च 2023 रोजी या (Onion Subsidy New Gr) शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी खाली लिंक वर करा.

Onion Subsidy: हे शेतकरी होणार कांदा अनुदानास पात्र, अनुदानासाठी अर्ज कसा करावा? नवीन शासन निर्णय जाहीर

शासन निर्णय डाउनलोड करा

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

1 thought on “Onion Subsidy: हे शेतकरी होणार कांदा अनुदानास पात्र, अनुदानासाठी अर्ज कसा करावा? नवीन शासन निर्णय जाहीर”

Leave a Comment