Punjab Dakh Call Recording स्वतःला हवामान तज्ञ म्हणून घेणाऱ्या पंजाबराव डख यांची सध्या कथित कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर प्रचंड (Punjab Dakh Call Recording) व्हायरल होत आहे. त्यामुळे हवामान अभ्यासाक पंजाबराव यांचा अंदाज पुन्हा एकदा वादाच्या भवऱ्यामध्ये अडकला आहे. निसर्गाच्या फेऱ्यांमध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांना चुकीच्या हवामान अंदाज यामुळे मनस्ताप झाला, परंतु आर्थिक झळ सहन करावी लागली अशी तक्रार शेतकरी करत आहेत.
पंजाबराव डख यांनी मागील काही दिवसात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यावेळी पंजाबराव डख यांना त्याचे काही स्वयं सोयरसूतक नाही. उलट त्यांनी ढगफुटीचे फोटो व्हाट्सअप स्टेटसला ठेवून शेतकऱ्यांची खिल्ली उडवली, असा आरोप नाशिक जिल्ह्यामधील एक शेतकरी दीपक जाधव यांनी केला आहे. पंजाबराव डख आणि दीपक जाधव यांच्या नावाने सध्या एक कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे.
नाशिक जिल्ह्यामध्ये 19 मार्च रोजी ढगफुटीचा अंदाज पंजाबराव यांनी वर्तवला होता. परंतु नाशिक जिल्हा ढगफुटी झालीच नाही. ढगफुटी न झाल्यामुळे भीतीने शेतकऱ्यांनी शेतमालाची काढणी करून घाईने तो बाजारपेठेमध्ये विकला या कारणावरून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त झाला. त्यानंतर नाशिक जिल्ह्यामधील दीपक जाधव यांनी पंजाबराव ढग साहेबांनी शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा व्हॉइस मेसेज व्हाट्सअप ग्रुप वरती पाठवले. हे सर्व पंजाबराव यांच्या लक्षात आले असता त्यांनी दीपक जाधव यांना कॉल केला. या संभाषणामध्ये “तुम्ही माझी बदनामी करू नका नाहीतर पुन्हा सांगितले नाही म्हणाल” अशी धमकी डख (Punjabrao viral Recording) यांनी जाधव यांना दिली. त्यानंतर तुम्ही खत, बियाणे कंपनीकडून पैसे घेऊन शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज सांगतात त्यात शेतकऱ्यांचे भले करण्यापेक्षा कंपनीचे भले करण्यावर तुमचा भर असतो असा आरोप त्या रेकॉर्डिंग मध्ये दीपक जाधव यांनी पंजाबराव यांच्यावर केला.
दीपक जाधव आणि त्यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यावरती पंजाबराव यांनी “तुम्ही तुमचं काम करा गप, लोकांची उकीरडी उकरू नका, नाहीतर सांगितले नाही म्हणाल. अशी धमकी दिल्याचे या कॉल रेकॉर्डिंग (Punjab Dakh Call Recording) मध्ये दिसून येत आहे. या कॉल रेकॉर्डिंग मध्ये डख आणि नाशिक जिल्ह्यामधील दीपक जाधव यांचे चांगलेच खटके उडालेले ऐकायला दिसत आहेत. या रेकॉर्डिंग मध्ये पुढे जाधव नावाच्या शेतकरी म्हणतात तुम्ही कंपन्याचे भले करून पैसे घेतात, शेतकऱ्यांचे नुकसान करता, तुमच्यासोबत गावातील चार गुंड आहेत. त्यांच्यासोबत तुम्ही पार्ट्या करतात दारू पितात. यानंतर डख त्यांना म्हणाले की तुम्ही काय करता तेही माहित आहे. उगाच माझ्या नादाला लागू नका ठेवा फोन आता असे म्हणत कॉल कट केला.
Punjab Dakh Call Recording
यापूर्वी पंजाबराव ढक यांच्या अशा कथित कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडिया वरती व्हायरल झाल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यामधील वसमत येथील शेतकऱ्यांची त्यांचा वाद झाला होता. त्यामध्ये शेतकऱ्यांनी पंजाब यांच्यावर चुकीचे हवामान अंदाज दिल्याचा आरोप देखील केला होता.
