RTE Lottery 2023: या तारखेला होणार ‘आरटीई’ ची सोडत, एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मिळणार नामवंत इंग्रजी शाळेमध्ये प्रवेश

By Bhimraj Pikwane

Published on:

RTE Lottery 2023

RTE Lottery: मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण अधिकार कायद्यानुसार राज्यांमधील खाजगी शाळेमध्ये 25 टक्के जागा आर्थिक दुर्बल मागास आणि अल्पसंख्यांक घटकांसाठी राखीव ठेवल्या जातात. यावर्षी राज्यांमधील1 लाख 1 हजार 969 विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश मिळणार आहे. 5 एप्रिल 2023 या दिवशी प्रवेशाची लॉटरी निघणार आहे.

आपल्या पाल्याला चांगल्या नामांकित इंग्लिश शाळेमध्ये शिक्षण घेण्याचे स्वप्न पालकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे पूर्ण होत नाही. त्यासाठी राज्य शासनाने आर टी ई ( RTE Addmission) अंतर्गत 25% जागा शिल्लक ठेवलेल्या आहेत. कायद्यानुसार प्रत्येक इंग्लिश स्कूलमध्ये 25% जागा शिल्लक ठेवणे सक्तीचे आहे. 2023-24 या शैक्षणिक वर्षांमध्ये राज्यांमधील 8828 इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांमध्ये आर टी ई (RTE Lottery) द्वारे प्रवेश दिला जाणार आहे.

यंदा राखीव जागा 1 लाख 1 हजार 969 असून या जागेसाठी राज्यभरामधून 30 लाख 66 हजार 562 विद्यार्थ्यांचे म्हणजे तीन पट अर्ज प्राप्त झाले आहेत. परंतु यामध्ये काही दुबार केलेले अर्ज, अपात्र, त्रुटी असलेले अर्ज देखील असतात. या अर्जाची पडताळणी करण्यासाठी सध्या एन आय सी च्या माध्यमातून सुरू आहे. हे काम सध्या अंतिम टप्प्यामध्ये आहे ते पूर्ण झाल्यावर नंतरच लगेच लॉटरी काढली जाणार आहे.

आर टी ई ची प्रवेश ( RTE Addmission) प्रक्रिया पूर्ण ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे त्यामध्ये कोणत्याही मानवी हस्तक्षेप चालणार नाही. 5 एप्रिल रोजी लॉटरी निघाल्यानंतर प्रवेशासाठी ठराविक मुदत दिली जाणार आहे. त्यानंतर या लॉटरी द्वारे काही विद्यार्थ्यांचे प्रवेश न झाल्यास, काही रिक्त जागा राहिल्यास प्रतीक्षा यादी मधील विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे.

RTE Lottery 2023: या तारखेला होणार 'आरटीई' ची सोडत, एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मिळणार नामवंत इंग्रजी शाळेमध्ये प्रवेश

RTE Admission 2023: आर. टी. ई. 25% अंतर्गत या मुलांना मोफत प्रवेश, ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2023-24, आवश्यक कागदपत्रे, सर्व माहिती

प्रवेश घेण्यासाठी ही कागदपत्रे तयार ठेवा

लॉटरीमध्ये निवड (RTE Lottery) झाल्याच्या नंतर प्रवेशासाठी शाळेत जाताना पालकांनी त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र रहिवासी दाखला मुलांचे आधार कार्ड अर्ज ची ऑनलाईन प्रिंट अर्जा वेळी भरलेल्या माहितीनुसार सर्व कागदपत्रे सोबत घेऊन जावी. खुल्या वर्गातील व एस ई बी सी वर्गातील मुलांसाठी एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले पालकाचा उत्पन्न दाखला लागतो त्यामुळे तो सोबत ठेवावा. ज्या दिवशी सोडत जाहीर होणार आहे त्या दिवशी अर्ज करताना जो मोबाईल क्रमांक टाकलेला असेल त्या मोबाईल क्रमांकावर निवड झाल्याचा मोबाईल वर मेसेज येणार आहे.

RTE Lottery: एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये लॉटरी

RTE Maharashtra Lottery Result 2023 आर टी ई अंतर्गत केलेल्या अर्जाची सध्या पडताळणी सुरू आहे. काही दिवसांमध्ये हे काम पूर्ण होणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रवेशाची लॉटरी काढली जाईल. त्यानंतर प्रवेश किती जणांना घेतले हे पाहून प्रतीक्षा यादीतील मुलांना संधी दिली जाणार आहे.

RTE Lottery 2023: या तारखेला होणार 'आरटीई' ची सोडत, एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मिळणार नामवंत इंग्रजी शाळेमध्ये प्रवेश

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Leave a Comment