Solar Yojana 2023 : कुसुम सोलर पंप योजनेचे अर्ज मंजूर होईना? हे काम करा

Solar Yojana : मित्रांनो कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्यांना आत्ताच काही दिवसापूर्वी एस.एम.एस. आले होते आणि त्यांना पैसे भरण्याकरता तसेच सेल्फ सर्वे (kusum self serve) करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मेसेज आल्यानंतर जे शेतकरी पात्र झाले होते ते शेतकऱ्यांनी आपले पंपाचे पेमेंट करून पुढची प्रक्रिया सुरू झाली होती.

परंतु मित्रांनो शेतकऱ्यांनी कुसुम सोलर पंप योजनेसाठी ( Kusum Solar Pump Yojana) अर्ज केले होते परंतु त्यांचे अर्ज अजून देखील प्रलंबित दाखवत होते त्यांचे अर्ज यु आर नॉट शॉर्टलिस्ट ( Your application is not shortlisted, Login will be resumed soon ) असे दाखवत होते त्यामुळे त्यांना प्रलंबित ठेवण्यात आले होते. अशा शेतकऱ्यांची आता पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. यांच्यामध्ये ज्याप्रमाणे यापूर्वीच्या टप्प्यासाठी याद्या बनवण्यात आल्या होत्या त्याचप्रमाणे आता यापुढील शेतकरी ज्यांना अद्याप देखील पेमेंटच्या मेसेज आले नाहीत किंवा त्यांना पुढील प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाही असे शेतकऱ्यांना यांच्यामध्ये समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

Solar Yojana त्याच्यासाठी कोणाच्या एखाद्या शेतकऱ्याच्या अर्जामध्ये जर काही त्रुटी असेल जसे की त्याची काही कागदपत्र अपूर्ण असतील तर त्या शेतकऱ्याला मेसेज द्वारे कळविण्यात येत आहे. तुटीमध्ये असे येते की आपल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आहे आपले काही कागदपत्रे जसे की पासबुक असेल आधार कार्ड असेल 7/12 असेल किंवा इतर काही कागदपत्रे असतील हे स्पष्ट दिसत नसेल तर त्यात मेसेज मध्ये त्याबाबत माहिती देण्यात येते. तसेच ती कागदपत्रे सादर करण्यासाठी सांगितले जाते. यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना मेसेज येण्यासाठी सुरू झालेले आहेत. आज पासून शेतकऱ्यांच्या अर्ज करताना जो मोबाईल क्रमांक दिला होता त्यावर ती मेसेज येतील किंवा काही शेतकऱ्यांना मेसेज देखील आले असतील.

Solar Yojana ज्या शेतकऱ्यांना अशा पद्धतीने कागदपत्र सादर करण्यासाठी मेसेज आले असतील अशा शेतकऱ्यांनी 10 मार्चपूर्वी आपली कागदपत्रे महाऊर्जाच्या कार्यालयामध्ये सादर करावी. आपल्याला मेसेज आल्यानंतर आपली कागदपत्रे 7 दिवसाच्या आत मध्ये सादर करणे गरजेचे आहे. ही कागदपत्रे शेतकऱ्यांनी सादर केल्यानंतर त्यांना पुढील प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाईल.

Solar Yojana यामुळे जे शेतकरी या अगोदरच पात्र झालेले आहेत परंतु ती त्रुटी मध्ये आहेत या शेतकऱ्यांची कागदपत्रे सादर केल्यानंतर त्रुटी काढली जाईल आणि ते पुढील प्रक्रियेसाठी पात्र राहतील. यामुळे त्या शेतकऱ्यांना लवकरच पैसे भरण्याकरता तसेच सेल्फ सर्वे (kusum self serve) करण्यासाठी मेसेज द्वारे कळविण्यात येईल.

मित्रांनो बरेच सारे शेतकऱ्यांचा प्रश्न होता की मी अर्ज केलेला आहे परंतु अजून देखील मी पात्र झालेलो नाही. मला पैसे भरण्याकरता ऑप्शन आले नाही अशा शेतकऱ्यांना हा अतिशय दिलासादायक निर्णय आहे.

Solar Yojana

Solar Yojana 2023 : कुसुम सोलर पंप योजनेचे अर्ज मंजूर होईना? हे काम करा

त्याच्यामुळे आपल्याला जर मेसेज आला असेल आपण कुसुम सोलर पंप योजनेचा अर्ज भरताना जो आपण मोबाईल क्रमांक दिलेला असेल त्या नंबर वरती आपल्याला जर मेसेज आलेला असेल तर ताबडतोब आपल्या कागदपत्रा सह आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणच्या महाऊर्जा कार्यालयामध्ये जायचे आहे.

महाराष्ट्र मधील सर्व जिल्हा निहाय महाऊर्जा कार्यालयाची यादी

Leave a Comment