Nuksan Bharpai: राज्यात अवकाळी पावसाने व गारपिटीने 14 जिल्ह्यामधील 28 हजार हेक्टर पेक्षा जास्त पिकाचे नुकसान, पहा आपल्या जिल्ह्याचा आकडा

By Bhimraj Pikwane

Published on:

Nuksan Bharpai

Nuksan Bharpai: अवकाळी च्या तिसऱ्या टप्प्यात 14 जिल्ह्यांमधील तब्बल 28 हजार हेक्टर क्षेत्र व त्यावरील पिके अवकाळी पावसाने नुकसान झाले आहेत त्यामध्ये सर्वात जास्त नाशिक जिल्ह्यामधील तब्बल आठ हजार हेक्टर पिकाचे नुकसान झाले आहे.

यामुळे आतापर्यंत नुकसानीचा आकडा हा 1लाख 30 हजार हेक्टर वर पोहोचलेला आहे. अवकाळी पावसाच्या पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच 4 ते 9 मार्च या तारखेला झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने (unseasonal rain and hail storm) राज्यांमधील 15 जिल्ह्यांमधील 38 हजार 606 हेक्टर पिकाचे नुकसान झाले होते. त्यानंतर गुढी पाडव्याच्या अगोदर दुसऱ्यांदा झालेल्या अवकाळी पावसामध्ये हजारो शेतकऱ्यांचा (Nuksan Bharpai) नुकसान झाले.

मार्च महिन्यामध्ये 15 ते 21 यादरम्यान या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यांमध्ये 1 लाख 60 हजार हेक्टर पिकाचे नुकसान झाले. आता चालू महिन्यांमध्ये तिसऱ्यांदा अवकाळी व गारपिटीमुळे कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार 28 हजार 287 हेक्टर पिकाचे नुकसान या अवकाळी पावसामुळे झाले आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 8003 हेक्टर पेक्षा जास्त कांदा, फळपीक व भाजीपाला पिकांचा समावेश आहे. त्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये 7305 हेक्टर वरील वाटाणा, कांदा, मका, आंबा, कलिंगड, झेंडू, हरभरा, गहू, बाजरी, ज्वारी व फळबागांमध्ये डाळिंब या पिकाचे नुकसान (crop damage) झालेले आहे.

अकोला जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे 5 हजार 859 हेक्टर वरील कांदा, हरभरा, गहू, भुईमूग व अनेक पिकांना नुकसानीचा फटका बसला आहे. राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी रविवारी या दिवशी छत्रपती संभाजी नगर व बीड या जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली असता, सोमवारी ते अकोला जिल्ह्यामध्ये नुकसानीची पाहणी करणार आहे. सुनील चव्हाण कृषी आयुक्त हे नाशिक जिल्ह्यामधील नुकसानीचे पाहणी करणार आहेत व अन्य वरिष्ठ अधिकारी धाराशिव,नगर या जिल्ह्यामध्ये नुकसानीची पाहणी करणार आहेत.

Nuksan Bharpai: जिल्हा निहाय नुकसान झालेले क्षेत्र हेक्टर मध्ये

 • रायगड 50
 • सिंधुदुर्ग 37
 • रत्नागिरी 46
 • नाशिक 8003
 • धुळे 29
 • पुणे 3
 • जळगाव 53
 • नगर 7305
 • बीड 2762
 • सातारा 47
 • बुलढाणा 1174
 • धाराशिव 2859
 • अकोला 5859
 • नागपूर 60
Nuksan Bharpai: राज्यात अवकाळी पावसाने व गारपिटीने 14 जिल्ह्यामधील 28 हजार हेक्टर पेक्षा जास्त पिकाचे नुकसान, पहा आपल्या जिल्ह्याचा आकडा

Dhan Bonus: या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना 10 कोटीचा बोनस जाहीर

असे एकूण 28 हजार 287 हेक्टर जिल्हा निहाय पिकाचे नुकसान झालेले आहे याचे पंचनामे देखील Nuksan Bharpai झालेले आहे.

Nuksan Bharpai: राज्यात अवकाळी पावसाने व गारपिटीने 14 जिल्ह्यामधील 28 हजार हेक्टर पेक्षा जास्त पिकाचे नुकसान, पहा आपल्या जिल्ह्याचा आकडा

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Leave a Comment