RTE Lottery: आर.टी.ई. प्रवेशाची पहिली यादी जाहीर, 25 एप्रिल पर्यंत आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा

By Bhimraj Pikwane

Published on:

RTE Lottery

RTE Lottery: जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून आरटी 2023 सर्व जिल्ह्यांमधील बालकांचे पहिली यादी ची निवड जाहीर झालेली आहे. यादीमध्ये निवड झालेल्या मुलांच्या पालकांनी 13 ते 25 एप्रिल या दरम्यान आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्याचे आव्हान केले आहे. RTE Maharashtra Lottery Result 2023-24

राज्यामध्ये सर्व जिल्हा न्याय शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खाजगी शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागा साठी आरटीई RTE Lottery 2023 ची प्रवेश प्रक्रिया दरवर्षी राबवली जाते. यावर्षीच्या प्रवेशाची प्रतीक्षा यादी राज्यस्तरावरून जाहीर करण्यात आलेली आहे. या यादी नुसार जिल्ह्यामधील या बालकांची पहिल्या यादीमध्ये निवड झालेली आहे. अशा बालकाच्या वडिलांनी 13 ते 25 या तारखेपर्यंत आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्याचे आव्हान जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे.

ज्या मुलांचा पहिल्या यादीमध्ये निवड झाली आहे अशा मुलांच्या वडिलांना त्यांनी अर्ज करते वेळेस जो मोबाईल क्रमांक दिला आहे. त्या मोबाईल क्रमांकावर निवड झाल्याचा एसएमएस RTE Lottery SMS देखील आलेला आहे. तरी पालकांनी आपला ऑनलाईन अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉगिन करून अलॉटमेंट लेटर ची प्रिंट व आवश्यक ती कागदपत्रे घेऊन संबंधित तालुका किंवा महापालिकेच्या पडताळणी केंद्रावर जाऊन आपल्या मुलांचा पडताळणी समितीकडून प्रवेश निश्चित करावा. पडताळणी समितीने मुलांचा प्रवेश निश्चित केल्यानंतर बालकांनी 30 एप्रिल पर्यंत शाळेमध्ये जाऊन आपल्या मुलांचा प्रवेश घ्यावा. तसेच प्रवेश निश्चित झाल्याची पावती व कागदपत्र शाळेमध्ये जमा केलेची खातर जमा करावी. rte portal maharashtra 2023-24

RTE Maharashtra Lottery Result 2023 Link – https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/

RTE Lottery: आर.टी.ई. प्रवेशाची पहिली यादी जाहीर, 25 एप्रिल पर्यंत आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा

RTE Admission: प्रवेश प्रक्रिया 2023 करिता महत्त्वाच्या सूचना व पुढील प्रक्रियेसाठी महत्त्वाच्या तारखा.

अशी करा RTE Lottery प्रवेशाची खात्री

ज्या मुलांचा पालकांनी अर्ज करताना नोंदवलेल्या मोबाईलवर एसएमएस आलेले आहे. परंतु फक्त एसएमएस वर अवलंबून न राहता आरटी पोर्टलवर आपल्या अर्जाची स्थिती त्यावर अर्ज क्रमांक लिहून आपल्या मुलांची निवड झाली किंवा नाही याची खात्री करून घ्यावी, अशा सूचना शिक्षण विभागाने पालकांना दिल्या गेले आहे. तसेच प्रवेश प्रक्रियेमधील अडचणीसाठी तालुका महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील सक्षम अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आव्हान देखील शिक्षण विभागाने केले आहे.

RTE Lottery: आर.टी.ई. प्रवेशाची पहिली यादी जाहीर, 25 एप्रिल पर्यंत आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

1 thought on “RTE Lottery: आर.टी.ई. प्रवेशाची पहिली यादी जाहीर, 25 एप्रिल पर्यंत आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा”

Leave a Comment