RTE Lottery: राज्यामधून आरटी प्रवेशासाठी 3 लाख 66 हजार 562 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्याची छाननी ची प्रक्रिया आता संपली आहे. एन आय सी कडून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेशाची लॉटरी काढण्याची तयारी सध्या सुरू आहे. बुधवार दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी ( rte lottery) लॉटरी काढली जाणार आहे.
राज्यामधील आरटी साठी ( RTE Lottery) 8 हजार 228 खाजगी इंग्लिश शाळेमध्ये 1 लाख 1 हजार 959 विद्यार्थ्यांना पहिली ते आठवी पर्यंत निःशुल्क शिक्षण मिळणार आहे. सध्या आरटी (rte) च्या प्रवेशाच्या अर्जाची छाननी आता संपलेली आहे. दिव्यांग विद्यार्थी, विधवा परीतत्या महिलांच्या मुलांसाठी निश्चित केलेल्या टक्केवारीत जागा सोडल्या जाणार आहेत. यानंतर शाळेमधील विद्यार्थ्यांचे घर यामधील अंतर एक किलोमीटर तर एक ते तीन किलोमीटर व तीन किलोमीटर पेक्षा जास्त अंतर असलेल्या मुलांची यादी ही स्वतंत्रपणे ऑनलाइन जाहीर ( RTE Lottery) केली जाणार.
बुधवारी 5 एप्रिल 2023 रोजी अर्जाची सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन लॉटरी निघेल अशी माहिती शालेय शिक्षण विभागाचे संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे. गरीब कुटुंबामधील विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश झाल्यानंतर मोठा आधार मिळून नामांकित शाळेमध्ये मोफत मध्ये शिक्षण घेण्याची ही एक मोठी संधी आहे.
यावर्षी राज्यामधील 1 लाख 1 हजार 959 मुलांना नामांकित इंग्रजी शाळेमध्ये पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षण मिळणार आहे. बुधवारी लॉटरी निघेल असे शरद गोसावी संचालक प्राथमिक शिक्षण पुणे हे म्हणाले.
लॉटरी पूर्वी ही कागदपत्र तयार ठेवा ( RTE Lottery )
- मुलाचा जन्म दाखला
- पालकाचा रहिवासी दाखला
- जर आपण इतर प्रवर्गामध्ये येत असाल तर जात प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- अपंग विद्यार्थी असल्यास त्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र

Google: गुगल वर चुकूनही सर्च करू नका या पाच गोष्टी, 10 लाखाच्या दंडासोबत खावी लागेल जेलची हवा
राज्यामध्ये आरटीई अंतर्गत 1लाख 1959 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. परंतु यावर्षी आरटीई साठी मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अर्ज केलेले ची संख्या तीन पट आहे. राज्यामध्ये एकूण 3 लाख 66 हजार 562 पालकांनी आर टी ई साठी अर्ज केले आहेत. परंतु 1 लाख 1959 एवढ्याच विद्यार्थीची आर टी ई ( RTE LOTTERY) अंतर्गत निवड होणार आहे.