Solar Energy Fence: सौर ऊर्जा कुंपण योजना साठी 75 टक्के अनुदान, येथे करा अर्ज

By Bhimraj Pikwane

Published on:

Solar Energy Fence

Solar Energy Fence: राज्यातील वनरक्षक क्षेत्राच्या जवळ असणाऱ्या गावासाठी (Solar Energy Fence) सौर ऊर्जा कुंपण योजना (Solar Fencing Yojana Maharashtra) साठी 75 टक्के अनुदान दिले जाणार आहे. या योजने संदर्भातील एक महत्त्वाचे अपडेट आहे. वनक्षेत्र लगतच्या गावातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे वन्य प्राण्यांपासून मोठे नुकसान होते. वन्य प्राण्यांपासून शेती संरक्षण मिळावं यासाठी सौर कुंपण योजना राबवली जावी अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून होत होती.

25 मे 2022 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक शासन निर्णय घेऊन 75 टक्के अनुदानावर सौर कुंपण योजना ही योजना ( Solar Kumpan Yojana) राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती. याच योजने संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय 30 मार्च 2023 रोजी एक महत्त्वपूर्ण नोटीस वन विभाग अमरावती यांच्या माध्यमातून काढण्यात आलेली आहे. डॉक्टर श्यामाप्रसाद जनवन योजनेअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या सौर ऊर्जा कुंपण योजनेअंतर्गत पात्र झालेल्या वैयक्तिक लाभार्थ्यांना सौर कुंपणाची उभारणी करणे व त्याचे देखभाल करणे इत्यादी बाबीसाठी एक सूचना काढण्यात आलेली आहे.

यां नीविद्येच्या माध्यमातून ही योजना 31 मार्च 2023 ते 17 मार्च 2023 या कालावधीमध्ये राबविण्यात येईल. याच कालावधीमध्ये निविदा भराव्यात असे देखील आव्हान करण्यात आले आहे. याच्यासाठीचे टेंडर महा टेंडर या संकेतस्थळावर देखील प्रकाशित करण्यात आलेले आहे. याच कालावधीमध्ये हे टेंडर भरले जाईल. या टेंडरच्या माध्यमातून निवड झालेल्या पुरवठादार यांची निवड केली जाईल व निवड झालेल्या पुरवठादार यांच्या माध्यमातून पात्र झालेल्या वैयक्तिक शेतकऱ्यांना या 75 टक्के अनुदान वर सौर ऊर्जा कंपनी (Solar Energy Fence) या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

अशा पद्धतीने शेतकरी प्रतीक्षेत असलेल्या या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे इतर वन विभागाच्या माध्यमातून देखील याच्यासाठीचे टेंडर मागवण्यात येतील व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.

सदर योजना अतिशय महत्त्वाची योजना आहे परंतु ही योजना डॉक्टर श्यामाप्रसाद जन वन योजना वनशेत्र जवळील गावासाठी राबवली जात आहे. शेतकऱ्याचे होणारे नुकसान लक्षात घेता शासनाच्या माध्यमातून सर्व राज्यभर ही योजना राबवली जावी अशा प्रकारची मागणी देखील शेतकऱ्यांकडून होत आहे.

Solar Energy Fence: सौर ऊर्जा कुंपण योजना साठी 75 टक्के अनुदान, येथे करा अर्ज

लाभार्थी निवडीचा निकष, अटी शर्ती पात्रता व योजनेविषयी सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.

लाभार्थी निवडीचे निकष Solar Energy Fence

  • सदर लाभार्थीकडे गावातील शेतीचा 7/12 व 8 अ उतारा ( Land Record) व वन हक्क कायद्याअंतर्गत पट्टावाटप केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.
  • लाभार्थी हा गावातील रहिवासी असणे आवश्यक आहे तथापि एखाद्या व्यक्तीकडे वरील एक प्रमाणे मध्ये नमूद केल्याप्रमाणे दस्तऐवज असल्यास त्यास ही अट लागू राहणार नाही.
  • ज्या व्यक्तीवर वन गुन्हा नोंदवण्यात आला आहे असेल अशा व्यक्तीस योजनेचा लाभ दिला जाणार नाही तथापि एखाद्या व्यक्तीवर वाटप झालेल्या वनपट्ट्या संदर्भात अतिक्रमण गुन्हा नोंदवला गेला असेल त्या व्यक्तीस या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • या योजनेअंतर्गत वैयक्तिक सौर ऊर्जा कुंपण (Solar Energy Fence) अथवा सामूहिक चैन लिंक फेन्सिंग यापैकी एकच लाभ दिला जाईल.

लाभार्थी निवड करण्याची कार्यपद्धत

  • संवेदनशील गावाची निवड झाल्यावर ग्राम परिस्थितीकीय विकास समिती संयुक्त वन व्यवस्थापन समिती आवश्यक माहिती ग्रामपंचायत सूचना फलकावर प्रसिद्ध करावी
  • अर्जदारांनी सौर ऊर्जा कंपनीचा लाभ घेण्यासाठी संबंधित ग्राम परिस्थितीकीय विकास समिती व संयुक्त वन व्यवस्थापन समिती यांच्याकडे आपले अर्ज सादर करणे आवश्यक राहील.
  • ग्राम प्लस परिस्थितीकीय विकास समिती व संयुक्त वन व्यवस्थापन समितीने अर्जदारांची पात्रता निश्चित केल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या मार्फत उपवन रक्षक यांच्याकडे निधी मागवण्याचा प्रस्तार सादर करावा.
Solar Energy Fence: सौर ऊर्जा कुंपण योजना साठी 75 टक्के अनुदान, येथे करा अर्ज

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

1 thought on “Solar Energy Fence: सौर ऊर्जा कुंपण योजना साठी 75 टक्के अनुदान, येथे करा अर्ज”

Leave a Comment