गोपीनाथ मुंडे अपघाती विमा योजनेचा असा घ्या लाभ.. अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसदाराला मिळते २ लाखाची मदत

केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनामधून शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध  योजनांपैकी एक योजना  म्हणजे, स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना (Gopinath Munde Accident Insurance Scheme) एखाद्या शेतकऱ्याचा अपघाती निधन झाल्यास त्याचा कुटुंबातील वारसाला २ लाख रुपयाची राज्य सरकार च्या माध्यमातून दिली जाते. ७ वर्षापासून हि योजना राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी यांचा विमा हफ्ता राज्य सरकार मार्फत भरण्यात आला आहे तसेच सर्व सातबारा धारक शेतकऱ्यांचा२ लाख रुपयांचा विमा काढण्यात आला आहे. gopinath munde apghat vima yojana

  • कशी मिळवाल मदत 

ज्या वेळेस अपघात होईल त्या वेळेसचा पोलिसाचा पंचनामा, पोस्टमार्टम रिपोर्ट, आठ अ , सातबारा, ६ ड, ६क, मृत्यूप्रमाणपत्र, शेतकर्याच्या वारसाचे प्रमाणपत्र, वरील सर्व कागदपत्रे कृषी विभागात जमा करावी लागतात. त्यानंतर कृषी विभाग जी कंपनी विमा साठी नियुक्त केली आहे त्या कंपनी कडे कागदपत्राची पूर्तता करतात. त्यानंतर योग्य ती चौकशी झाल्या नंतर शेतकऱ्याला किंवा शेतकऱ्याच्या वारसाला विमा रक्कम दिली जाते.

  • मदतीचे स्वरूप खालील प्रमाणे 

एखाद्या शेतकऱ्याचे अपघातामुळे २ डोळे अथवा २ अवयव निकामी झाले असतील किंवा शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला असेल तर शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून २ लाख देण्यात येत आहे. जर अपघाता दरम्यान एक अवयव म्हणजे एक डोळा किंवा एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रु. नुकसान भरपाई देण्यात येते.  

 हे पण वाचा: पी एम किसान योजनेची ई केवायसी तर केली पण पूर्ण झाली का? असे पहा स्टेट्स मोबाईल वरून

वरील लेख आपल्या मित्रांना पाठवण्यास विसरू नका. किंवा आपल्या काही प्रश्न  असल्यास, कमेंट करून नक्की कळवा… धन्यवाद 🙏🏻
 
अशाच पद्धतीच्या नवनवीन पोस्ट साठी खाली दिलेल्या आमच्या राज्यस्तरीय WhatsApp  तसेच Telegram ग्रुप ला जॉईन करा..🙏👇

👉 जॉईन  WhatsApp group
👉 जॉईन  Telegram Group

Leave a Comment