Kusum Solar Yojana: या 17 जिल्ह्यामध्ये कुसुम सोलर पंप योजना नवीन ऑनलाईन अर्ज सुरू

By Bhimraj Pikwane

Published on:

Kusum Solar Yojana

Kusum Solar Yojana: कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर कृषी सोलर पंप दिले जातात ही योजना राज्यामधील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवली जाते या योजनेअंतर्गत 2022 मध्ये काही जिल्ह्यांमध्ये सोलार पंप चा कोटा शिल्लक न राहिल्यामुळे नवीन सोलर पंप अर्ज बंद झाले होते.

Kusum Solar Yojana आता 2023 मध्ये राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये या वर्षाचा सोलर पंप कोठा उपलब्ध झाला असल्यामुळे शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन आपला जिल्हा निवडून आपण अर्ज ऑनलाईन सादर करू शकता. कुसुम सोलर पंप योजनेसाठी आपल्याला जर अर्ज भरायचा असेल तर शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन खालील कागदपत्रे सोबत आपण ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा.

कुसुम सोलर पंप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे Kusum Solar Yojana

 • विहीर किंवा बोरची नोंद असलेला सातबारा
 • 8 अ उतारा
 • पासबुक किंवा कॅन्सल चेक
 • आधार कार्ड
 • अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
 • सामायिक विहीर नोंद असेल तर खातेदाराचे ना हरकत 200 रुपये बोंडवर शपथपत्र.

कुसुम सोलर पंप योजनेसाठी अर्ज करण्यासाठी वरील सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहेत ही कागदपत्रे आपण व्यवस्थित नीट स्कॅन करून ऑनलाईन अपलोड करावी.

कुसुम सोलर पंप योजना नवीन अर्ज खालील जिल्ह्यामध्ये कोठा उपलब्ध झाला असून नवीन ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सुरू झाले आहे.

Kusum Solar Yojana: या 17 जिल्ह्यामध्ये कुसुम सोलर पंप योजना नवीन ऑनलाईन अर्ज सुरू

नवीन ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोठा शिल्लक असलेले जिल्हे खालील प्रमाणे

 1. रत्नागिरी
 2. अमरावती
 3. अकोला
 4. वर्धा
 5. नागपूर
 6. रायगड
 7. पालघर
 8. सातारा
 9. गडचिरोली
 10. कोल्हापूर
 11. सांगली
 12. चंद्रपूर
 13. गोंदिया
 14. पुणे
 15. सिंधुदुर्ग
 16. भंडारा
 17. ठाणे

वरील 17 जिल्ह्यामध्ये नवीन अर्ज सुरू झाले आहे तरी शेतकऱ्यांनी कसल्याही प्रकारची वाट न पाहता लवकरात लवकर आपला अर्ज सादर करून घ्यावा कारण की जास्त लोड झाल्यास किंवा तांत्रिक अडचणीमुळे वेबसाईट बंद राहू शकते.

ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी ऑफिसियल वेबसाईट https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B

Kusum Solar Yojana: या 17 जिल्ह्यामध्ये कुसुम सोलर पंप योजना नवीन ऑनलाईन अर्ज सुरू

Solar Pump Yojana: शेतात सौर कृषी पंप बसवलाय? अशी घ्या सौर कृषी पंपची काळजी

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Leave a Comment