Sand Booking: 600 रुपये प्रति ब्रास वाळू बुकिंगसाठी असा करा ऑनलाईन अर्ज|Sand booking on mahakhanij

By Bhimraj Pikwane

Published on:

Sand booking on mahakhanij
Sand Booking: 600 रुपये प्रति ब्रास वाळू बुकिंगसाठी असा करा ऑनलाईन अर्ज|Sand booking on mahakhanij

Sand Booking: शासनाच्या माध्यमातून वाळूसाठी ऑनलाईन बुकिंग कशी करायची आज आपण या टॉपिकच्या माध्यमातून पाहणार आहोत. 1 मे 2023 पासून राज्यामध्ये शासकीय वाळू नवीन धोरण लागू करण्यात आले आहे. या धोरणानुसार सर्वसामान्य नागरिकांना सहाशे रुपये प्रतिब्रास म्हणजेच 133 रुपये प्रति मॅट्रिक टन या दराने व घरकुल लाभार्थ्याला 5 ब्रास पर्यंत वाळू मोफत स्वरूपामध्ये दिली जाणार आहे.

आज दिनांक 1 मे 2023 रोजी श्रीरामपूर येथे एका कार्यक्रमादरम्यान एका वाळू घाटाचे उद्घाटन करण्यात आले आहे. उद्घाटनादरम्यान लाभार्थ्याला चार ब्रास वाळूचे वितरण देखील करण्यात आले आहे. अशा पद्धतीने हळूहळू राज्यांमध्ये वाळू घाटाची निर्मिती करून लाभार्थ्यांना या वाळूचे वितरण सुरू केले जाणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो वाळूचे वितरण करत असताना लाभार्थ्याला वाळू विकत घेण्यासाठी ऑनलाईन बुकिंग कशी करायची हे आज आपण या टॉपिक मध्ये पाहणार आहोत.

Sand booking on mahakhanij
Sand booking on mahakhanij

Sand Booking: वाळू मागणीसाठी अशी करा ऑनलाईन बुकिंग

mahakhanij महा खनिज या शासनाच्या वेबसाईट वरती जाऊन आपण स्वतः वाळू बुकिंग करू शकता. किंवा आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन देखील आपण यासाठी बुकिंग करू शकता. ही वाळू बुकिंग करण्यासाठी आपला आधार क्रमांक किंवा आधार कार्ड असणे गरजेचे आहे.

वाळू बुकिंग साठी आवश्यक कागदपत्र

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • राशन कार्ड
  • एक पासपोर्ट फोटो
  • मोबाईल क्रमांक ओटीपी साठी

बुकिंग करण्यासाठी आपण गुगलच्या माध्यमातून mahakhanij असे सर्च करून महाखणीजच्या (Sand booking on mahakhanij) वेबसाईटवर जाऊ शकतात किंवा डायरेक्ट लिंक www. mahakhanij.Maharashtra.gov.in वरती क्लिक करा.

वेबसाईट वरती आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला वरच्या भागांमध्ये 3 नंबरला SAND BOOKING नावाचा एक ऑप्शन दिसेल. सांड बुकिंग (Sand Booking) पर्यायवर क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर एक नवीन पेज उघडेल.

प्रथम आपल्याला STOCKYARD DETAILS या पर्यायावर क्लिक करून आपल्या जिल्ह्यामध्ये डेपो निर्माण झाला आहे की नाही याची तपासणी करू शकता. सध्या फक्त अहमदनगर या जिल्हा करता डेपो निर्मिती करण्यात आली आहे त्या ठिकाणची माहिती आपल्याला त्या लिस्टमध्ये पाहावयास मिळेल.

बाकी जिल्ह्यांमध्ये डेपोची निर्मिती झाल्यानंतर आपल्याला बुकिंग करता येणार आहे. वाळूसाठी बुकिंग करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला लॉगिन एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे. लॉगिन वरती क्लिक केल्यानंतर आपण वेबसाईट वरती पहिल्यांदाच आल्यामुळे आपल्याला यूजर आयडी आणि पासवर्ड विचारेल परंतु आपल्याकडे युजर आयडी आणि पासवर्ड नसल्यामुळे आपण साईनाथ नावाच्या ऑप्शन वरती क्लिक करून आपले नाव ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक टाकून आपण आपला यूजर आयडी आणि पासवर्ड तयार करून घेऊन लॉगिन हा पर्यावरण क्लिक करून लॉगिन व्हावे.

युजर आयडी आणि पासवर्ड तयार केल्यानंतर आपल्याला लॉगिन करायचे आहे आणि आपली प्रोफाइल कम्प्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपल्याला वाळूसाठी बुकिंग करता येईल. मित्रांनो वाळू बुकिंग (Sand Booking) माहिती व्हिडिओ स्वरूपात पाहण्यासाठी आपण खाली व्हिडिओची लिंक देत आहे. त्यासाठी त्या लिंक वरती क्लिक करून सविस्तर माहिती जाणून घ्या.

Sand Booking: वाळू ऑनलाईन बुकिंग कशी करायची व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

1 thought on “Sand Booking: 600 रुपये प्रति ब्रास वाळू बुकिंगसाठी असा करा ऑनलाईन अर्ज|Sand booking on mahakhanij”

Leave a Comment