Solar Pump Yojana: सौर पंपासाठी अर्ज भरायला सुरू परंतु शेतकऱ्यांची अर्ज करताना दमछाक

Solar Pump Yojana: सौर पंपासाठी अर्ज भरायला सुरू परंतु शेतकऱ्यांची अर्ज करताना दमछाक

Solar Pump Yojana: प्रधानमंत्री कुसुम सौर पंप योजना अंतर्गत शेतकऱ्यांना सौर पंप देण्यासाठी दुसरा टप्पा बुधवारी दिनांक 17 मे 2019 रोजी महाऊर्जाच्या (Mahaurja) वेबसाईट वरती संकेतस्थळ सुरू झाले. महा ऊर्जा मार्फत पीएम कुसुम सौर पंप (Kusum Solar Pump Yojana) योजनेसाठी अर्ज करण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू आहे. परंतु संकेतस्थळावर अर्ज करताना शेतकऱ्यांना खूप सार्‍या अडचणी येत आहेत. सारखे-सारखे संकेतस्थळ लोड करूनही संकेतस्थळ सुरू होत नाही. जेव्हा संकेतस्थळ सुरू झाले तोपर्यंत जिल्ह्यातील कोटा संपला असे दर्शवण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांची सुरू आहे परिणामी हजारो शेतकरी अर्ज करण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण म्हणजेच महाऊर्जा च्या वतीने राज्यामध्ये महा कृषी ऊर्जा अभियान म्हणजेच पीएम कुसुम घटक ब योजनेचा पुढील टप्पा राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सौर कृषी पंपासाठी खुल्या गटाला 90 तर अनुसूचित जमातीसाठी 95 टक्के अनुदान देण्यात येते. त्यासाठी शेतकऱ्यांना महाऊर्जाच्या ऑनलाइन पोर्टलवर https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B या लिंक वर अर्ज सादर करावा लागतो.

17 मे 2023 रोजी जिल्हा निहाय कोठा उपलब्ध करून दिला आहे. हा कोर्टा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा पोर्टल बंद करण्यात येणार आहे. शेतीपंपाचे सौर ऊर्जा करण करण्यासाठी केंद्र शासन प्रधानमंत्री कुसुम सौर पंप योजना (Kusum Solar Pump Yojana) सुरू केली आहे. प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना या योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये 1 लाख 18 हजार 897 शेतकऱ्यांनी अर्ज ऑनलाईन दाखल केले होते. त्यापैकी 70 हजार 529 शेतकऱ्यांनी सौर पंपाची रक्कम भरलेली आहे. तर 59 हजार 659 शेतकऱ्यांनी सौर पंप पुरवठादारांची निवड केली आहे त्यामुळे हे पंप बसवले जातील.

Solar Pump Yojana- सौर पंपाची भरणारक्कम

खुला गटातील लाभार्थ्याला तीन एचपी पंपासाठी 19380 रुपये तर पाच एचपी पंपासाठी 26975 व साडेसात एचपी पंपासाठी 37 हजार 440 रुपये रक्कम भरावी लागते. तसेच अनुसूचित जाती आणि जमाती साठी तीन एचपी पंपासाठी 9690 पाच एचपी पंपासाठी 13488 व साडेसात एचपी पंपासाठी १८७२० रुपये एवढी रक्कम भरावी लागते.

या अगोदर लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना संधी नाही

प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजनेचा लाभ दोन वेळा घेता येणार नाही त्यामुळे यापूर्वी लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनी आता ऑनलाईन अर्ज सादर करू नये असे आवाहन महाऊर्जामार्फत केले गेले आहे. या अगोदर लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी जर अर्ज सादर केला तर त्यांचा अर्ज बाद केला जाईल.

गुन्हाही दाखल होणार

प्रधानमंत्री कुसुम सौर पंप योजना अंतर्गत कृषी पंपाचा लाभ घेतलेले शेतकरी सौर कृषी पंप (Solar Pump Yojana) काढून ठेवतात आणि लाभ घेतला नसल्याचे दाखवून देतात आणि दुसरा सौर कृषी पंप बसून घेतात. अशाप्रकारे कुणी जर पंप बसून घेतल्यास त्यांचा सौर कृषी पंप काढून घेण्यात येईल व त्यांनी भरलेली लाभार्थी हिशाची रक्कम जप्त केली जाईल असे महाऊर्जा ने सांगितले आहे. व अशा शेतकऱ्यांवर गुन्हा ही दाखल करण्यात येणार आहे.

अनेक गावांची नावे भूजल सर्वेक्षण सुरक्षित गावांच्या यादीमध्ये नाहीत.

अनेक शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज सादर करताना खूप सारे अडचणी येत आहेत. भूजल सर्वेक्षण विभागाने जाहीर केलेल्या सुरक्षित गावांच्या यादीमध्ये कुसुम सौर पंप योजनेअंतर्गत पंप मंजूर करण्यात येत आहेत. अनेक गावांची नावे सुरक्षित गावांच्या यादीमध्ये नसल्याने या गावातील शेतकरी सौर पंप घेण्यास पात्र होत नाहीत. परंतु हे शेतकरी डिझेल पंप वापरत असतील तर त्यांना सौर पंप बसवून देण्यात येतील असे अर्ज भरताना सांगण्यात येत आहे.

Solar Pump Yojana: सौर पंपासाठी अर्ज भरायला सुरू परंतु शेतकऱ्यांची अर्ज करताना दमछाक

कुसुम सोलर पंप योजना जिल्हा निहाय पात्र लाभार्थी यादी

ऑनलाइन अर्ज सादर करताना येणाऱ्या अडचणी

बुधवार दिनांक 17 मे 2023 रोजी अर्ज ऑनलाईन सादर करण्यासाठी संकेतस्थळ सुरू झाले. परंतु संकेतस्थळ कसल्याही प्रकारे काम करत नव्हते. ही स्थिती गुरुवारी देखील अशीच राहिली. राज्यभरात मधून लाखो शेतकऱ्यांचे अर्ज करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. लाखो शेतकरी अर्ज करण्याचा प्रयत्न करीत असल्याने संकेतस्थळ लोड वरती चालत होते व मेंटनस चे काम सुरू आहे अशी मेडाच्या अधिकाऱ्याने माहिती दिली. परंतु शुक्रवारी 19 मे रोजी दुपारनंतर संकेतस्थळ सुरू झाले मात्र तोपर्यंत खुल्या गटातील जिल्ह्यातील कोठा संपला होता. असे संदेश संकेतस्थळावर येऊ लागले. शेतकऱ्यांना एक प्रश्न पडला की संकेतस्थळच चालत नव्हते तर खोटा संपला कसा. Solar Pump Yojana

Solar Pump Yojana: सौर पंपासाठी अर्ज भरायला सुरू परंतु शेतकऱ्यांची अर्ज करताना दमछाक

सोलर पंप योजनेचा अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit Mhshetkari