Crop Insurance: 1 रुपयात पिक विमा योजना सुरू, या तारखे अगोदर भरा आपला पिक विमा

By Bhimraj Pikwane

Published on:

Crop Insurance Scheme

Crop Insurance Scheme: यावर्षीपासून एक रुपयांमध्ये पिक विमा काढता येणार आहे. तर काढणीनंतर नुकसानीसाठी 30 टक्के तंत्रज्ञान आधारित भारांक निश्चित केले जाणार आहे. राज्यामध्ये पुढील तीन वर्षाकरिता प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी अकरा विमा कंपन्या नियुक्त करण्यात आलेले आहेत. यावर्षीपासून केंद्र सरकारने पिक विमा योजना राबविण्यासाठी नवीन कार्यकारणी पद्धत जारी केली आहे. तसेच निर्देश राज्य सरकारला देण्यात आले आहेत.

गेल्या वर्षापासून राज्यामध्ये 80:110 याचाच अर्थ नफा तोटा मॉडेलनुसार पिक विमा योजना राबवली जाते. पिक विमा योजना ही बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. तसेच भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी भाडेकरार आवश्यक आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम खरीप हंगामासाठी दोन टक्के तसेच रब्बी हंगामासाठी दीड तर खरीप आणि रब्बी असे एकत्र पाच टक्के असतो. परंतु यावर्षीपासून सर्व समावेशक पिक विमा योजनेअंतर्गत फक्त आता एक रुपयांमध्ये पिक विमा नोंदणी करता येणार आहे. Crop Insurance Scheme

या योजनेच्या माध्यमातून निश्चित करण्यात आलेला पीकनिहाय प्रती हेक्टर विमा हप्ता तसेच उर्वरित फरक हा सर्वसाधारण विमा हप्ता याचे अनुदान समजून राज्य सरकार भरणार आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी या अगोदर प्रत्येक वर्षी कंपन्या निवडीसाठी निविदा प्रक्रिया राबवली जात होती. परंतु यावर्षीपासून केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार पुढील तीन वर्षाकरिता ही योजना राबवली जाणार आहे. यांनी दिला प्रक्रियानंतर अकरा कंपन्या ची निवड करून खरीप हंगामासाठी 31 जुलै पर्यंत शेतकऱ्यांना आपला पिक विमा पिक विमा पोर्टलवर भरता येणार आहे. Crop Insurance Scheme

पीक वर्गवारी खरीप हंगाम खालील प्रमाणे

 • त्रण धान्य व कडधान्य पिके: खरीप ज्वारी, नाचणी, बाजरी, तूर, उडीद, मूग, मका.
 • गळीत धान्य पिके: सूर्यफूल, सोयाबीन, कारळे, तीळ, भुईमूग.
 • नगदी पिके: कापूस, खरीप कांदा

जिल्ह्यानुसार निश्चित केलेल्या विमा कंपन्या खालील प्रमाणे

विमा कंपनी जिल्हे
ओरिएंटल इन्शुरन्स कं. लि.नगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा
आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कं. लि.परभणी, वर्धा, नागपूर
युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं. लि.जालना, गोंदिया, कोल्हापूर
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं. लि.नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
चोलामंडलम एम एस. जनरल इन्शुरन्स कं. लि.छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड 
भारतीय कृषी विमा कंपनीवाशीम, बुलडाणा, सांगली, नंदुरबार 
एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कं. लिहिंगोली, अकोला, धुळे, पुणे
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं. लि.यवतमाळ, अमरावती, गडचिरोली
एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्शुरन्स कं. लि.उस्मानाबाद
एसबीआय जनरल इन्शुरन्स कं. लि.लातूर 
भारतीय कृषी विमा कंपनीबीड
Crop Insurance Scheme company

पिक विमा वेळापत्रक

 • शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक
 • खरीप हंगाम 2023 साठी 31 जुलै 2023
 • खरीप हंगाम 2024 व 2025 साठी 15 जुलै
 • रब्बी हंगाम ३० नोव्हेंबर ज्वारी, 15 डिसेंबर गहू, बाजरी, हरभरा, कांदा व इतर पिके.
 • 31 मार्च उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग.
Crop Insurance: 1 रुपयात पिक विमा योजना सुरू, या तारखे अगोदर भरा आपला पिक विमा

Crop Insurance या नुकसानी झाल्यास मिळणार विमा रक्कम

 • हवामान प्रतिकूल परिस्थितीमध्ये झालेले नुकसान.
 • पीक पेरणी पासून तर काढणीपर्यंतच्या कालावधीमध्ये नैसर्गिक आग, गारपीट, वीज कोसळणे, चक्रीवादळ, वादळ, पूर, जमिनीमध्ये पाणी साचणे, भूखलन, दुष्काळ पावसामधील खंड किंवा कीड व रोग.
 • नैसर्गिक आपत्ती पासून होणारे नुकसान.
 • नैसर्गिक कारणामुळे होणारे काढणीनंतर नुकसान.

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Leave a Comment