Kharip Season 2023: शेतकरी बांधवांनो बियाणे खरेदी करताना, ही काळजी घ्या

By Bhimraj Pikwane

Published on:

Kharip Season 2023
Kharip Season 2023: शेतकरी बांधवांनो बियाणे खरेदी करताना, ही काळजी घ्या

Kharip Season 2023 चांगले उत्पादन मिळवायचे असेल तर चांगले बियाणे घेणे ही एक महत्त्वाची बाब आहे. सध्या बऱ्याच साऱ्या कंपन्या आपापल्या बियाण्याची चांगल्या प्रतीची जाहिरात करून शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा जाहिरातीला शेतकऱ्यांनी बळी पडू नाही यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते. खरीप हंगाम 2023 या परिस्थितीमध्ये चांगले बियाणे निवडून घेणे हे एक महत्त्वाचे आहे. कारण की पिकाचे उत्पन्न हे बियाण्याच्या दर्जेदारपणावरती अवलंबून असते. यामुळे खरीप हंगामासाठी बियाणे खरेदी करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी याविषयी कृषी विद्यापीठाचे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी दिलेली माहिती पाहुयात.

बियाणे खरेदी अगोदर बीज प्रमाणीकरण यंत्रणेने प्रामाणिक केलेले बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे. बियाणे खरेदी करत असताना बियाण्याच्या पाकिटावरती बियाण्याचे जातीचे नाव, बियाणाचा प्रकार, गट क्रमांक, उत्पादकांचे नाव व पत्ता, बीज प्रशिक्षण कधी केले त्याची तारीख, उगवण क्षमता किती टक्के आहे त्याचे प्रमाण त्यानंतर शुद्धतेचे प्रमाण, पाकिटावरील बियाण्यांचे एकूण वजन विक्रीची किंमत व त्यानंतर विक्रेत्याची सही इत्यादींची नोंद तपासूनच शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करावे. Kharip Season 2023

शेतकरी बांधवांनी सर्वात महत्त्वाची घ्यावयाची काळजी म्हणजेच बियाणे खरेदी केल्यानंतर पक्के बिल घ्यावे या बिलावर ती बियाण्याचे पीक आणि वान तसेच गट क्रमांक, व बिलावरती बियाणे खरेदी केल्याची तारीख असल्याची खात्री करून घ्यावी. शेतकऱ्यांनी मुदत संपलेले बियाण्याचे पॉकेट तसेच फोडलेले पॉकेट खरेदी करू नाही हे एक महत्त्वाची काळजी घ्यावी. Kharip Season 2023

वरील सर्व बाबी जर आपण व्यवस्थित नीट पाहून बियाणे खरेदी केले तर भविष्यामध्ये जर आपल्या बियाणे मध्ये काही दोष आढळला व आपल्या तक्रार करण्याची गरज पडली तर वरील बाबी महत्त्वाच्या ठरतात त्याशिवाय आपली तक्रार ग्राह्य धरली जात नाही. Kharip Season 2023

आपण जर बियाणे खरेदी केले असेल तर खरेदी केलेले बियाणे वापरण्यापूर्वी पिशवीच्या खालील बाजूस एक छोटा होल पाडून त्यातून बियाणे बाहेर काढावे. देण्याचे पाकिटावरील टॅगन काढता रिकामी पिशवी व त्यामधील बियाण्याच्या थोडासा नमुना म्हणून शिल्लक ठेवून बियाणे खरेदी केलेली पावती आपल्यापाशी जपून ठेवावी. बियाणे पेरणी करत्या वेळी शक्यतो वेगळ्या दोन कंपन्यांचे बियाणे एकत्र पेरणी करू नाही.

जर आपण खरेदी केलेले बियाण्याची उगम क्षमता जर कमी असेल तर त्या बियाणे विक्रेता आणि कंपनीवर आपण बियाणे कायदा 1966 मधील कलम 10 नुसार कारवाई करू शकतात. तसेच बियाणे विषयी दुसरी काहीही तक्रार असल्यास आपण जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक किंवा जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी किंवा कृषी विकास अधिकारी यांच्याकडे आपण अर्जाद्वारे लेखी आपली तक्रार देऊ शकतात.

वरील सर्व बाबी आपण लक्षात घेऊन कमी दर्जाच्या बियाण्यामुळे जर आपले आर्थिक नुकसान झाले तर आपण जिल्हा ग्राहकांच्याकडे तक्रार नोंदवून आपण नुकसान भरपाई मागू शकता. अशा पद्धतीने शेतकरी बांधवांनो बियाणे खरेदी करताना सर्व गोष्टीची खबरदारी घ्यावी व आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी.

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Leave a Comment