
Monsoon Update: राज्यामधील सगळे शेतकरी सध्या वरून राज्याची वाट पाहत असून अखेर आता ही प्रतीक्षा संपलेली आहे. केरळ राज्यामध्ये उशिरा मान्सून दाखल झाल्यामुळे सगळीकडेच पाऊस उशिरा सुरू झाला. परंतु आता मात्र पावसाने वेग धरल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. मागील पंधरा दिवसापासून शेतकरी आणि सर्वसामान्य जनता वरून राजाची वाट पाहत होती. परंतु शेतकरी वर्गांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे.
दरवर्षी राज्यामध्ये सात जून पासून पावसाला सुरुवात होते परंतु यावर्षी 11 जून 2023 पासून मान्सून लांबणीवर आहे. बिपर जॉय या चक्रीवादळामुळे मान्सून पुढे ढकलला होता. परंतु सध्या मान्सून योग्य हवामान स्थिती आहे याद्या काही तासांमध्ये सर्वत्र पावसाला सुरुवात होणार आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर पुढील दोन आठवड्यामध्ये राज्यांमधील सर्व विभागांमध्ये पाऊस हजेरी लावीन असे देखील हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.

Monsoon Update
विदर्भामधील काही भागांमध्ये आज दिनांक 23 जून रोजी पावसाचे आगमन झाले आहे. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये पाऊस जोर धरेल अशी माहिती पुणे येथील हवामान शास्त्र विभाग प्रमुख के होसाळीकर यांनी दिली आहे. पुढील तीन-चार दिवसांमध्ये महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणाच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या कारणास्तव पुढील तीन-चार दिवसांमध्ये जोरदार पावसाचे आगमन होण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे.