Namo Shetkari Yojana: या तारखेला 73 लाख शेतकऱ्यांना मिळणार प्रत्येकी 4 हजार रुपये, या 16 लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ

Namo Shetkari Yojana: या तारखेला 73 लाख शेतकऱ्यांना मिळणार प्रत्येकी 4 हजार रुपये, या 16 लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ

Namo Shetkari Yojana: केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेच्या आधारावरती शिंदे आणि फडणवीस सरकारने नमो शेतकरी सन्मान निधी योजना राज्यामध्ये या वर्षी सुरु केली. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला नाही. जवळपास 73 लाख शेतकऱ्यांना 1 जुलै दरम्यान हा हप्ता वितरित होण्याची शक्यता आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत 2 हजार रुपये व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 2 हजार रुपये असे 4 हजार रुपये शेतकऱ्यांना 1 जुलै दरम्यान मिळणार आहेत. Namo Shetkari Yojana

परंतु राज्यामधील 16 लाख शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार आहेत. कारण की ज्या शेतकऱ्यांनी अजूनही आपले आधार प्रमाणे करण पूर्ण केले नाही अशा शेतकऱ्यांना म्हणजेच असे 16 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

म्हणजेच याच्यावरून असे ठरते की आता केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 14 हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. हा आता वितरण करण्यासाठी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते राज्यामध्ये योजनेचा मोठा लोकार्पण सोहळा होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पंतप्रधानांना यासाठी निमंत्रण दिलेला आहे. Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana: एक जुलैला वितरित होणार नमो शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता

कृषी दिनाचे निमित्त साधून राज्यामध्ये 73 लाख शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासंघ निधी योजनेचा पहिला हप्ता म्हणजेच दोन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी अजूनही आपले आधार प्रमाणे करण किंवा ई केवायसी आपल्या जमिनीची नोंदणी न केलेले 16 लाख शेतकरी अजूनही शिल्लक आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या आधार प्रमाणे करण केले नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरच आपली प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान केंद्र शासनाने व राज्य शासनाने दिले आहे.

Namo Shetkari Yojana: हे काम करा तरच मिळेल लाभ

  1. आधार प्रमानींकरण
  2. इ केवायसी
  3. जमिनीची एकत्रित ऑनलाईन नोंद
Namo Shetkari Yojana: या तारखेला 73 लाख शेतकऱ्यांना मिळणार प्रत्येकी 4 हजार रुपये, या 16 लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ

 या कारणामुळे पंजाब डख यांचा हवामान अंदाज चुकला, सोशल मीडियावर पंजाब डख यांची बदनामी सुरू

Leave a Comment