Pm Kisan Yojana: पी एम किसान योजनेचा 14 वा हप्ता येण्यापूर्वी करा हे काम, अन्यथा…

By Bhimraj Pikwane

Published on:

Pm Kisan Yojana
Pm Kisan Yojana: पी एम किसान योजनेचा 14 वा हप्ता येण्यापूर्वी करा हे काम, अन्यथा…

Pm kisan yojana सध्या सर्व शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेचा चौदावा हप्ता कधी येणार आहे याची आशा आहे. जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा चौदावा हप्ता मिळणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे परंतु याबाबत देखील कोणती अधिकृत माहिती केंद्र शासनाकडून प्राप्त झालेली नाही. ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपली इकेवायसी कम्प्लीट केली नाही अशा शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा चौदावा हप्ता मिळणार नाही. अशा शेतकऱ्यांना आपली pm kisan ekyc पूर्ण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या तारखेपर्यंत करून घ्या आपली Ekyc

ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपली इकेवायसी पूर्ण केली नाही अशा शेतकऱ्यांनी 23 जून 2023 पर्यंत आपली केवायसी पूर्ण करण्याच्या आव्हान केंद्र शासनामार्फत करण्यात आले आहे. जर आपल्याला 14 वा हप्ता रक्कम आपल्या खात्यामध्ये मिळवायचे असेल तर आपल्याला ही केवायसी करणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपले आधार कार्ड अपडेट केलेले नाही अशा शेतकऱ्यांना 23 जून पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. जरा प्लीज केवायसी पूर्ण झालेली असेल तर आपल्याला पुन्हा केवायसी कम्प्लीट करण्याची गरज नाही.

तेरावा हप्ता हा 27 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आला होता त्यामुळे केंद्र शासनाकडे 14 हप्ता जारी करण्यासाठी जुलै 2023 पर्यंत वेळ आहे. या परिस्थिती दरम्यान केंद्र शासनाकडून 14 हप्ता जून ते जुलै दरम्यान कधीही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो.

अशी करा पूर्ण पी एम किसान इ केवायसी (PM KISAN EKYC)

ज्या शेतकरी बांधवांना किंवा त्यांच्या घरामधील इतर कोणाला थोडे देखील इंटरनेटचे ज्ञान आहे असे शेतकरी बांधव आपल्या घरी बसून स्वतःच्या मोबाईलवरून आपली इकेवायसी पूर्ण करू शकतात.

  • इ केवायसी कम्प्लीट करण्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर www.pmkisan.gov.in जावे लागेल.
  • या वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्यालाही pm kisan Ekyc हा एक ऑप्शन त्या ठिकाणी दिसेल.
  • इ के वाय सी या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपला आधार क्रमांक त्या ठिकाणी टाकावा.
  • त्यानंतर आपल्या आधार लिंक मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी येईल तो ओटीपी त्या ठिकाणी टाकावा.
  • वरील सर्व प्रोसेस पूर्ण केल्यानंतर आपली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची केवायसी यशस्वीरित्या पूर्ण केली जाईल.

ही एक केवायसी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला चौदावा हप्ता कोणत्याही अडचणी शिवाय आपल्या खात्यामध्ये जमा केला जाईल.

अशाच पद्धतीच्या माहितीसाठी मित्रांनो आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका.

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Leave a Comment