Weather Update Today: राज्यात आणखी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला, या 8 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

By Bhimraj Pikwane

Published on:

Weather Update Today

Weather Update Today: राजधानी मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यात मान्सून सुरू होऊनही अनेक भागात लक्षणीय पाऊस झाला नाही. मात्र, गेल्या आठवडाभरात मान्सूनने राज्याचा मोठा भाग व्यापला असून, अनेक भागांना दिलासा मिळाला आहे. आज पुन्हा एकदा मुंबई आणि ठाण्यासह आठ जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय पुढील पाच दिवस कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता आहे. Weather Update Today

हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज, गुरुवारी मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा, तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. Weather Update Today

Weather Update Today: पुण्याची परिस्थिती कशी आहे?

पुढील दोन दिवसांत, भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुणे शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, काही भागात मुसळधार आणि जोरदार सरी पडतील. ४ जुलैपर्यंत पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. बुधवारी रात्री 8.00 वाजेपर्यंत 8.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभर कमाल तापमान 28.1 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 22.7 अंश सेल्सिअसवर पोहोचले. पावसाने दमट वातावरणातून थोडा दिलासा दिला. डोंगराळ आणि पठारी भागात मुसळधार पाऊस झाला. येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. punjab dakh havaman andaj live

Weather Update Today
Weather Update Today

मुंबईलाही फटका बसलाय!

मंगळवारी जारी करण्यात आलेल्या ऑरेंज अलर्टची मुदत संपल्यानंतर बुधवारी सकाळपासूनच मुंबईत पावसाचा जोर वाढला. उत्तर मुंबई आणि ठाण्यात जोरदार पाऊस झाला. सकाळच्या वेळी पावसाच्या जोरात लक्षणीय वाढ झाल्यानंतर प्रादेशिक हवामान विभागाने बुधवारी मुंबई विभागासाठी पुन्हा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला. सकाळी 8:30 ते सायंकाळी 5:30 या कालावधीत कुलाबा आणि सांताक्रूझ या दोन्ही ठिकाणी 77 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याव्यतिरिक्त, स्वयंचलित हवामान केंद्रांनुसार, नऊ तासांत 154.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दहिसरमध्ये 106 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. Weather Update Today

Weather Update Today: राज्यात आणखी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला, या 8 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
पंजाब डख हवामान अंदाज live

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Leave a Comment