E Peek Pahani: खरीप 2023 ई पीक पाहणी नोंदणीला सुरुवात, ई पीकपाहणी करा नाहीतर मिळणार नाही पिक विमा व अनुदान

E Peek Pahani: राज्यात चांगल्या प्रतीचा पाऊस झाल्यामुळे खरीप 2023 च्या पेरणी झाले आहेत. एक जुलै 2023 पासून शेतकरी पिक पाहणी नोंदणी करू शकतात. ई पीक पाहणी नोंदणी करण्यासाठी नवीन अपडेट झालेले एप्लीकेशन आले आहे. ई पीक पाहणी करण्यासाठी आता तलाठी कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही आपण घरी बसल्या आपल्या मोबाईल वरून ई पाहणी करू शकतात. E Peek Pahani new App ई-पीक पाहणी

खरीप 2023 साठी पिक पाहणी करण्यासाठी प्ले स्टोर वर जाऊन आपले जुने एप्लीकेशन अपडेट करून घ्यावे. किंवा आपल्या मोबाईल मध्ये जर नवीन अद्यावत एप्लीकेशन नसेल तर Play Store जाऊन नवीन ॲप्लिकेशन डाऊनलोड घ्यावे. नवीन एप्लीकेशन मध्ये भरपूर साऱ्या सुधारणा झाल्यामुळे आपण जलद गतीने आपली ईपीक पाहणी करू शकतात.

E Peek Pahani 2023 | E-Peek Pahani ई-पीक पाहणी

15 ऑगस्ट 2021 पासून राज्यामध्ये महसूल विभागाने मोहीम सुरू केली. खरीप हंगाम व रब्बी हंगाम या दोन्ही हंगामामध्ये आपण मोबाईल द्वारे ई पीक पाहणी पूर्ण करू शकता. सध्या स्थितीला राज्यामधील 1 कोटी 88 लाख शेतकऱ्यांनी हे ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये नोंदणी केली आहे.

शासनाने लिपिक पाहणी नोंदणीचा पर्याय शेतकऱ्यांना सुलभ गतीने सुरू केला असला तरीही दुर्गम भागामध्ये शेतकऱ्यांकडे मोबाईल साक्षरता नसल्यामुळे पीक पाणी त्या ठिकाणी होत नाही. अशा वेळेस जे शेतकरी दुर्गम भागातील आहे यांची पीक पाणी न झाल्यास त्यांनी आपल्या गावातील तलाठ्याकडे जाऊन आपली ई पिक पाहणी करून घ्यावी.

E Peek Pahani: खरीप 2023 ई पीक पाहणी नोंदणीला सुरुवात, ई पीकपाहणी करा नाहीतर मिळणार नाही पिक विमा व अनुदान

Leave a Comment