Cotton Spray: अमावस्येला कापुस पिकावर फवारणी का करावी? अमावस्या आणि बोंड अळी संबंध व व्यवस्थापन…

By Bhimraj Pikwane

Published on:

Cotton Spray

पोळा अमावस्या कापूस फवारणी ? Cotton spray

Cotton Spray नमस्कार शेतकरी मित्रांनो , पोळ्याच्या अमावस्या आणि कापुस फवारणीचे खुप जुने कनेक्शन आहे. कापुस पिकाचे बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे 40 ते 50 टक्क्यापर्यत नुकसान होऊ शकते. हे नुकसान टाळण्यासाठी आपल्याला पोळ्याच्या अमावस्येला फवारणी करणे जरुरीचे असते. जेनेकरुन पुढे होणारे नुकसान आपल्याला टाळता येईल. तर पोळ्याच्या अमावस्येलाच का फवारणी करावी यामागील शास्त्रीय कारण काय आहे, ते या लेखात सविस्तर पाहुया :

अमावस्या आणि कापुस फवारणी चे काय कनेक्शन आहे ?

आता भरपूर शेतकऱ्याला पडणारा प्रश्न आहे, कि पोळ्याच्या अमावस्येला फवारणी का करावी ? तर याचे उत्तर आहे, आता कापुस पिकाला पाते,फुलधारणा होत आहे. लवकर लागवड झालेल्या पिकाला बोंडे सुद्धा लागत आहे.अशा अवस्थेत बोंडअळीचा पिकावर अँटक होत असतो. बोंडअळीचे पतंग हे अमावस्येच्या ( अंधार्या रात्री ) रात्री अंडी घालतात.व त्यातुन दोन तीन दिवसात अळी बाहेर येत असते. त्यासाठी आपल्याला अमावस्येच्या आधी एक दोन दिवसानी किंवा नंतर एक दोन दिवसात अंडीनाशक  किटकनाशकाची फवारणी करावी लागेल.

Cotton Spray: अमावस्येला कापुस पिकावर फवारणी का करावी? अमावस्या आणि बोंड अळी संबंध व व्यवस्थापन...

अमावस्या आणि बोंड अळी संबंध सविस्तर माहिती ? Cotton Spray New Moon and Worm Relationship

मित्रानो, कापूस या पिकावर अळी पडण्याचा कालावधी हा ठरलेला असतो, आणि तो म्हणजे अमावस्या सर्व सजीव श्रुष्टीचा मीलन आणि फलन काळ हा अमावस्या असतो, प्रत्येक महिन्याच्या अमावाश्येला एक दोन दिवस मागे पुढे, म्हणजे महिन्याच्या ज्या 4/5 काळ्याकुट्ट रात्री असतात, त्या रात्री अळीचे पतंग अंडी घालतात, हि अंडी पिकांच्या लुसलुशीत पानावर ,पातीच्या देठावर घालतात, हि अंडी साधारणतः 48 ते 72 तासात उबवतात

 (ते तापमानावर अवलंबुन असते, तापमान कमी असेल, तर 4 दिवसात हि उबवतात)

Cotton Spray: अमावस्येला कापुस पिकावर फवारणी का करावी? अमावस्या आणि बोंड अळी संबंध व व्यवस्थापन...

 त्यातून अतिशय सूक्ष्म अळी जन्माला येते ती साध्या डोळ्यांनी दिसत नाही इतकी सूक्ष्म असते, ती प्रथम फुलात जाते व एक दोन दिवसांनी फुलांच्या पाकळ्या आतून वाळतात फुलांचा रंग फिकट जांभळट होतो , तीच डोमकली तयार होते. 2/4 दिवसात हि अळी फुलांच्या आत असलेल्या लहान कैरीच्या आत जाते, कैरीच्या आत गेल्यावर तिची संपूर्ण अवस्था तेथेच पूर्ण होते, अली ज्या मार्गाने कैरी गेलेली असते तो मार्ग कैरीच्या वाढीमुळे बंद होतो व आपल्याला माहिती पडत नाही की कैरीत अळी आहे ते.आणि म्हणूनच या अळी ला कोणतेही किळनाशक मारू शकत नाही, तुम्ही ती कैरी रात्रभर किळनाशकात बुडवून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी फोडून पहिली तरी ,ती जीवन्त सापडेल. या सेंद्री अळीचे आयुर्मान 35 दिवसाचे असू शकते.

      मित्रानो आपण ह्या अळीला मारू शकत नाही, हिच्यावर नियंत्रण करायचे असेल तर , अमावस्येच्या 2 दिवसांनी अंडीनाशक फवारणी करणे, किंवा ती अति सूक्ष्म अवस्थेत पण कैरीच्या आत जाण्याच्या अगोदरच अळी नाशक फवारा मारून.

Cotton Spray: अमावस्येला कापुस पिकावर फवारणी का करावी? अमावस्या आणि बोंड अळी संबंध व व्यवस्थापन...

सेंद्रीवर अळी वर उपाय

     अळी कैरीत गेल्यामुळे आपण तिला मारू शकत नाही, आपल्या हातात फक्त अंडी नासवणे आणि प्राथमिक अवस्तेतील अळी मारणे हेच उपाय शिल्लक राहतात.अमावस्ये नंतर चे 4 दिवस त्यासाठी महत्वाचे असतात, आणि या 4 दिवसात जर आपण योग्य ती आणि योग्य प्रमाणात किळनाशक फवारणी केली तर 80 ते 90% सेंद्री अळी चे नियंत्रण करू शकतो.

कपाशी वरील बोंड अळी चे व्यवस्थापन

अमावस्येच्या 2 दिवसांनी खालील फवारणी करावी. प्रमाण 15 लिटर पाण्यासाठी आहे.

१) थोयोडीकार्ब 20 ग्रॅम ,नीम अर्क 20% 30 मिली ,स्प्रे + 2 मिली, प्रोफेनोफॉस 30 मिली.

२) इमामेकटींन बेंझोइत 8 ग्रॅम, DDVP 30 मिली, निमार्क 20% 30 मिली,स्प्रे + 2 मिली.

३) प्रोफेनोफॉस 35 मिली, deltamethrin 20 मिली , नीम अर्क 20 % 30 मिली, स्प्रे + 2 मिली.

वरील प्रमाणे अमावस्ये नंतर 1 फवारा मारल्यावर 5 ते 7 दिवसांनी.

१) थोयोडी कार्ब 30 ग्रॅम, क्लोरो 50% 35 मिली, नीम अस्त्र 20% 30 मिली ,स्प्रे + 2 मिली.

२) डेल्टा मेथ्रीन 20 मिली , DDVP 30 मिली, नीम अर्क 20% 30 मिली, स्प्रे + 2 मिली

३) डायपेल 50 ते 60 मिली, नाराणास्त्र 10 मिली,निमास्त्रा 20% 30 मिली, स्प्रे + 2 मिली.

टीप कोणत्याही परिस्थितीत प्रोफेनोफॉस, क्लोरोपायरीफॉस, लगातार 2 वेळा फवारू नका त्यामुळे कापूस पिकाची पानगळ होते. हा माझा अनुभव आहे.

वरील फवारणीचा परिणाम

Cotton Spray: अमावस्येला कापुस पिकावर फवारणी का करावी? अमावस्या आणि बोंड अळी संबंध व व्यवस्थापन...

प्रोफेनोफॉस अळी व अंडी नाशक असल्यामुळे प्राथमिक अवस्तेतील अळी मरेल अंडी नासल्यामुळे अळी अंड्यातून बाहेर येणार नाही.नीम अर्कात ऍझोडीरेकटींन हा घटक अंडी नाशक आहे, अंडी नासतील , नीम अर्काचा तीव्र कडू वासा मूळे पतंग अंडी आपल्या शेतात घालणार नाहीत ,भुकेने व्याकुळ होऊन अली मरेल. स्प्रे + हे अत्यन्त पॉवर फुल पेनेट्रेट होणारे सिलिकॉन स्प्रेडर आहे , पानावर 1 थेंब जरी किलनाशक पडले तरी ते संपूर्ण पानात भिनले जाईल, इमामेकटींन, थोयोडी कर्ब, deltamethrin, हे जहाल विष आहे अळीचा खात्मा होईल.

  सिन्थेटिक पायरेथ्रीड औषधाचा, वापर केल्यामुळे पिकाला शॉक बसतो, तसेच चिकटा पडू शकतो, व पांढऱ्या माशीचे प्रमाण वाढू शकते.ती मारल्यानंतर एखादे टॉनिक ची फवारणी आवस्यक असते.

     आमावस्ये नंतर हे 2 फवारे मारल्या नंतर 15/20 दिवस फवारणी करावी लागणार नाही, पण तो पर्यंत पुढची आमावस्या येईल, मग पुन्हा वरील प्रमाणेच करावे लागेल.

   ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या दोन्ही आमावस्या सांभाळा ,कापसाचे उत्पन्न चांगले येईल हे खात्रीने सांगतो. धन्यवाद

Cotton Spray: अमावस्येला कापुस पिकावर फवारणी का करावी? अमावस्या आणि बोंड अळी संबंध व व्यवस्थापन...

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Leave a Comment