Weather Update : आज राज्यात या भागात मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा यलो अलर्ट

Weather Update: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने झोडपले आहे. दरम्यान, आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातील तीन भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Weather Update : आज राज्यात या भागात मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा यलो अलर्ट

पुणे आणि मुंबईसाठी आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. विदर्भातील बहुतांश भागात आज यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. १ ऑक्टोबरपासून पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. 2 ऑक्टोबर रोजी राज्यभर ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला होता.

Weather Update:

त्याचवेळी, हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मुंबई आणि मुंबई उपनगरांसारख्या काही भागात मुसळधार पाऊस पडेल, तर काही भागात हलका पाऊस पडेल. मुंबई, ठाणे, रायगड आणि कोकण या किनारपट्टी जिल्ह्यांनाही गुरुवारी पावसाने झोडपले. ठाणे जिल्ह्यासाठी आज हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, रायगड आणि रत्नागिरीतही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा आणि इतर ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसांत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Close Visit Mhshetkari