PM Kusum Solar Yojana: या कारणामुळे 2500 शेतकऱ्यांचे सोलर अर्ज त्रुटी मुळे प्रलंबित

PM Kusum Solar Yojana अपारंपारिक कृषी जलपंपांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने असलेल्या प्रधानमंत्री कुसुम योजना प्रकल्पाला बुलढाणा या कृषी जिल्ह्यात मध्यम प्रतिसाद मिळाला आहे. हजारो शेतकऱ्यांचे अर्ज त्रुटींमुळे रखडले असल्याची माहिती आहे. या योजनेत कृषी पंपांसाठी वीज आणि इतर पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांना पर्याय म्हणून सौरपंपांची तरतूद आहे. यासाठी शेतकऱ्यांना महाऊर्जा पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

PM Kusum Solar Yojana: या कारणामुळे 2500 शेतकऱ्यांचे सोलर अर्ज त्रुटी मुळे प्रलंबित

Kusum solar yojana या प्रदेशात खाती असलेल्या शेतकऱ्यांची संख्या सुमारे सहा लाख आहे. त्या तुलनेत जिल्ह्यातील केवळ २४ हजार ९८७ शेतकऱ्यांनी कुसुम पोर्टलवर अर्ज केले आहेत. मात्र आतापर्यंत केवळ 2,332 शेतकऱ्यांना सौरऊर्जा पंपाचा लाभ झाला आहे. तब्बल 2 हजार 528 अर्ज त्रुटींमुळे अडकले आहेत. या त्रुटी दूर करण्याची अंतिम मुदत २४ सप्टेंबर आहे. परंतु वरील आकडेवारी पाहता या योजनेला मिळणारा प्रतिसाद उदासीन असल्याचे स्पष्ट होते आणि या उपयुक्त योजनेचा शेतकऱ्यांपर्यंत प्रसार व प्रचार करण्यासाठी यंत्रणेने पुरेसे प्रयत्न केले नाहीत असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

Leave a Comment