पी एम किसान योजनेची ई केवायसी तर केली पण पूर्ण झाली का? असे पहा स्टेट्स मोबाईल वरून ( pm kisan ekyc was done but it was completed see status on your mobile phone)
सध्या पी एम किसान (pradhan mantri kisan sanman nidhi yojana) योजनेची ई केवायसी करण्यासाठी सर्व शेतकरी धावपळ करत आहेत. पी एम किसान योजने अंतर्गत सर्व शेतकर्यांना ६००० रु. वार्षिक मिळत असतात. हि रक्कम ३ हप्त्यामध्ये शेतकर्यांना दिली जाते. २००० रु प्रत्येक ४ महिन्याला शेतकर्यांच्या खात्यात जमा होते. आत्तापर्यंत १० हफ्ते शेतकऱ्याच्या खात्यात जमा केले आहेत परंतु पी एम किसान योजनेत भरपूर गैर प्रकार झाल्या मुळे शेतकर्यांना पुढील हप्त्याची रक्कम मिळण्यासाठी केंद्र सरकारने पी किसान ई केवायसी pm kisan Ekyc करणे बंधनकारक केले आहे. आणि याची तारीख ३१ मार्च वरून ३१ मे २०२२ पर्यंत वाढवून पण दिली आहे. बऱ्याच शेतकर्यांनी ekyc केली आहे आणि काही शेतकरी अजून बाकी पण आहेत. परंतु आपण ekyc तर केली पण ती पूर्ण झाली का नाही कसे पाहावे या बद्दल आपण माहिती पाहणार आहोत.
- पी एम किसान ई केवायसी स्टेटस कसे पाहावे?
स्टेटस पाहण्यासाठी आपल्याला पी एम किसान च्या website वर जायचे आहे https://pmkisan.gov.in/NewHome3.aspx या वेबसाईटवर गेल्या नंतर उजव्या बाजूला आपल्याला Farmer Corner मधील Beneficiary Status या ऑप्शन वर जाऊन तिथे आपला आधार नंबर टाकून आपले स्टेटस चेक करावे लागेल. आधार नंबर टाकून सर्च केल्या नंतर आपली सर्व माहिती आपल्या समोर दिसेल त्यामध्ये आपले नाव आपल्याला किती हप्त्ते आत्तापर्यंत मिळाले आहेत त्याची माहिती तसेच Account Type मध्ये जर आपला Adhar असे दिसत असेल तर समजून घ्या कि आपली ई केवायसी पूर्ण झाली आहे आणि आपल्या आधार ला जी बँक लिंक आहे त्या खात्यात आपल्याला पुढील हापत्याची रक्कम मिळून जाईल.
- आपल्या आधार ला कोणती बँक लिंक आहे कसे पाहावे ?
त्यासाठी आपल्याला खाली दिलेल्या आधार च्या वेबसाईट वर जायचे आहे
वेबसाईट गेल्या नंतर आपला आधार नंबर तसेच त्या ठिकाणचा कॅपचा कोड टाकायचा त्यानंतर आपल्या आधार ला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक ऑ टी पी जाईल तो ओ टी पी टाकल्यानंतर आपल्या आधार ला जी बँक लिक आहे तिचे नाव खाली आपल्याला दिसेल. म्हणजे त्या बँक खात्यात आपल्याला पुढील हप्ता मिळणार.
