PM Kisan Yojana Installment Update : पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार, लाभार्थी यादीत तुमचे नाव तपासा

By Bhimraj Pikwane

Published on:

PM Kisan Yojana Installment Update

PM Kisan Yojana Installment Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या १५व्या हप्ता प्रतीक्षा आता संपली आहे. लवकरच पंतप्रधान किसान योजनेचा पंधरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र त्याआधी लाभार्थी यादीत तुमचे नाव तपासा. तसेच, जर तुम्ही अद्याप EKYC केले नसेल, तर ते आवश्यक आहे. PM Kisan Yojana Installment Update

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या पंधराव्या हप्ता दिवाळीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आता दिवाळीनंतर शेतकऱ्यांची प्रतीक्षाही संपणार आहे. त्यामुळे देशभरातील शेतकरी आपल्या खात्यात पैसे जमा होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पीएम किसान योजनेच्या १५ व्या हप्ता १५ नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील.

15 व्या हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल PM Kisan Yojana Installment Update

केंद्र सरकार लवकरच प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 15 वा हप्ता जारी करणार आहे. किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana Installment Update) योजना सुरू केली आहे. यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६,००० रुपये उत्पन्न मिळणार आहे. आतापर्यंत 14 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करून शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

‘या’ दिवशी मिळणार पीएम किसान योजनेचा हफ्ता

मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 15 वा हप्ता 15 नोव्हेंबर 2023 रोजी देशभरातील करोडो शेतकर्‍यांच्या खात्यात पोहोचेल. जर तुम्ही PM किसानच्या 15 व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर लाभार्थी यादीत तुमचे नाव एकदा तपासा.

PM Kisan Yojana Installment Update : पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार, लाभार्थी यादीत तुमचे नाव तपासा

लाभार्थी यादीत तुमचे नाव तपासा

  • पीएम किसान वेबसाइटला भेट द्या https://pmkisan.gov.in/
  • “पेमेंट यशस्वी” टॅब अंतर्गत, तुम्हाला भारताचा नकाशा दिसेल.
  • उजवीकडे पिवळा टॅब डॅशबोर्ड दिसेल, त्यावर क्लिक करा
  • तुम्ही डॅशबोर्ड टॅबवर संपूर्ण तपशील भरू शकता.
  • राज्य, जिल्हा, उपजिल्हा आणि पंचायत निवडा.
  • त्यानंतर तुम्ही तपशील निवडू शकता.

योजनेची स्थिती पाहा

  • पीएम किसान वेबसाइटला भेट द्या https://pmkisan.gov.in/
  • (Know Your Status) या पर्यायावर क्लिक करा
  • नोंदणी क्रमांक आणि सत्यापन कोड प्रविष्ट करा.
  • Get data क्लिक करा
  • आता तुम्हाला स्टेटस दिसेल. यामुळे तुम्ही लाभार्थी यादीत आहात की नाही हे स्पष्ट होईल.

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Leave a Comment