Abha Health Card: 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारासाठी आपले व परिवाराचे असे काढा आभा हेल्थ कार्ड

Abha Health Card केंद्र सरकार मार्फत आरोग्य विभागाअंतर्गत एक नवीन योजना सुरू केली आहे. केंद्र शासनाकडून आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट आभार म्हणजेच आभार डिजिटल हेल्थ कार्ड नवीन पोर्टल तयार करण्यात आले आहे. या हेल्थ कार्ड abha card मध्ये प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची माहिती डिजिटल स्वरूपात एकत्रित करून ठेवण्यात येणार आहे. आभा हेल्थ कार्ड हे डिजिटल स्वरूपातील कार्ड आहे यामध्ये कोणत्याही रुग्णाची आजाराची आणि त्याच्यावर केलेल्या उपचाराची माहिती साठवून ठेवण्यात येणार आहे. यामुळे त्या रुग्णाची संपूर्ण मेडिकल हिस्टरी डॉक्टरांना तपासणी खूप सोपे होणार आहे.

हे कार्ड काढल्यानंतर आपल्याला एक 14 अंकी हेल्थ आयडी मिळतो. या कार्ड अंतर्गत आपण 5 लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय सुविधा मिळू शकतो. आभा हेल्थ कार्ड पूर्णपणे निशुल्क आहे. या कार्डद्वारे आपण पाच लाखापर्यंत मोफत वैद्यकीय सुविधा मिळू शकतात. आभा हेल्थ द्वारे कार्ड धारकांना 14 अंकी एक ओळख क्रमांक मिळतो हे कार्ड काढण्यासाठी आपण आपल्या आधार क्रमांक व मोबाईल नंबर वापरून तयार करू शकता.

आभा हेल्थ कार्ड चे फायदे काय? What is the benefits of Abha card?

 • आभा हेल्थ कार्ड मुळे तुम्हाला तुमचे आरोग्य केंद्र आणि वैद्यकीय तपासण्या डॉक्टरांना दाखवण्यासाठी मदत होईल.
 • आपले सर्व वैद्यकीय माहिती तसेच संपूर्ण भारतामधील डॉक्टरांशी शेअर करू शकता.
 • आपण आपला वैद्यकीय सर्व माहिती व्यवस्थित साठवून ठेवून डॉक्टरांना शेअर करू शकता.
 • आभा कार्ड मुळे आपल्या सर्व आरोग्याची तपासणी रेकॉर्ड दर्शवू शकता.
 • हे डिजिटल ओळखपत्र आहे ज्यामध्ये काढ धारकाचे आरोग्य विषयीच्या सर्व नोंदी उपलब्ध असतात.

आभा हेल्थ कार्ड नेमकी काय आहे? What is Abha health card?

हे हेल्थ कार्ड आहे या हेल्थ कार्ड मध्ये आपल्याला एक 14 अंकी हेल्थ आयडी मिळतो या आयडीवरून आपण आपल्या आरोग्याची सर्व नोंद साठवून ठेवू शकतो आणि डॉक्टरांशी शेअर करू शकतो.

आभा हेल्थ काढण्यासाठी कोण पात्र असणार? Who are eligible for Abha card?

 • भारतामधील सर्व भारतीय व आयुष्यमान भारत कार्ड धारक या योजनेसाठी पात्र आहेत.
 • दुसरे म्हणजे आपले सर्व कुटुंबाचे मिळून एकत्रित उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
 • भारतामधील सर्व प्रवर्गातील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

असे काढा आभा हेल्थ कार्ड आपल्या मोबाईल वरून. Abha Health id card online apply

 • सर्वप्रथम आपल्याला https://healthid.ndhm.gov.in/ या वेबसाईटवर जा.
 • त्यानंतरच तेथील Create Abha Number या पर्यायावर क्लिक करा.
 • त्यानंतर खालील प्रमाणे पेज आपल्या समोर दिसेल.
Abha Health Card
 • आपण आपले आभा हेल्थ कार्ड दोन पर्यायनुसार काढू शकता एक आधार नंबर वरून आणि दुसरे म्हणजे आपल्या ड्रायव्हिंग लायसन वरून
 • त्यापैकी आपण दोन्हीपैकी एक पर्याय निवडावा जसे की मी आता आधार वापरून आभार तयार करणार आहे त्यामुळे Using Aadhaar या पर्यायावर ती क्लिक करतो.
 • युजिंग आधार या पर्यायावर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर खालील प्रमाणे पेज आपल्यासमोर दिसेल.
Abha Health Card

 • आता आपल्याला चार स्टेप मध्ये आपलं हेल्थ कार्ड तयार होणार आहे त्यामुळे पहिली स्टेप आहे आधार कार्ड
 • आपल्याला आपला आधार नंबर टाकून खाली दिलेल्या पर्यायावर टिक करायचे आहे. त्यानंतर खालील जो कॅपचा आहे बेरीज किंवा वजाबाकी यामध्ये त्याचे उत्तर देऊन नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करायचे.
 • त्यानंतर आपल्या आधारला जो मोबाईल क्रमांक जोडलेला असेल त्या मोबाईल क्रमांक वर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून बाकी सर्व प्रोसेस कम्प्लीट करून घ्यायची आहे यामध्ये आपले नाव पत्ता सर्व डिटेल भरायचे आहे आणि आपले आबा हेल्थ कार्ड त्यानंतर तयार होईल.
 • Abha Health Card हेल्थ कार्ड खालील प्रमाणे आपल्यासमोर दिसेल ते आपल्याला त्यानंतर डाऊनलोड करून घ्यायचे आहे.
Abha Health Card

Abha Health Card हेल्थ कार्ड स्टेप बाय स्टेप कसे काढायचे याची माहिती पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा.

3 thoughts on “Abha Health Card: 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारासाठी आपले व परिवाराचे असे काढा आभा हेल्थ कार्ड”

Leave a Comment