Anganwadi Bharti: या जिल्ह्याचे अंगणवाडी सेविका मदतनीस साठी अर्ज सुरू, असा करा अर्ज

Anganwadi Bharti मित्रांनो बऱ्याच दिवसापासून अंगणवाडी भरती Anganwadi Bharti संदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये जाहिराती सुरू झालेले आहेत यापूर्वी आपण नाशिक जिल्ह्यामधील तसेच सोलापूर जिल्ह्यामधील अंगणवाडी भरती जाहिरातीची सविस्तर अशी माहिती पाहिलेली आहे. तर मित्रांनो आजच्या या टॉपिक मध्ये आपण पुणे जिल्ह्यामधील अंगणवाडी भरतीसाठी 818 जागा रिक्त आहेत आणि या भरतीचे अर्ज मागवण्यासाठी सुरू आहेत याविषयी माहिती पाहणार आहोत.

मित्रांनो पुणे जिल्हा परिषद अंतर्गत अंगणवाडी भरती 2023 अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या एकूण 818 रिक्त जागा भरण्यासाठी पदाप्रमाणे पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यासाठी सुरू झालेले आहेत. या सर्व पदासाठी अर्ज हा ऑफलाईन करायचा आहे. पुणे जिल्ह्यातील Anganwadi Bharti अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका ८१८ रिक्त जागेचा तपशील व ऑफलाईन अर्ज याविषयी सविस्तर माहिती पाहूयात.

Educational Qualification For Pune Anganwadi Bharti

पदाचे नाव – अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका
पद संख्या – 818
शैक्षणिक पात्रता – अंगणवाडी सेविका/मिनी अंगणवाडी सेविका किमान बारावी उत्तीर्ण
अंगणवाडी मदतनीस किमान बारावी उत्तीर्ण
वयाची अट – 18 ते 35 वर्षे
अर्ज पद्धत – ऑफलाईन
अधिकृत संकेतस्थळ – https://zppune.org/pgeHome.aspx

पद तपशील खालील प्रमाणे

अंगणवाडी सेविका 134 पदे
अंगणवाडी मदतनीस 653 पदे
मिनी अंगणवाडी सेविका 31 पदे

रिक्त जागेचा तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाची कागदपत्र Anganwadi Bharti Important Documents

 1. स्थानिक रहिवासी असलेला दाखला
 2. आपत्यबाबत घोषणापत्र
 3. नावाबाबत प्रतिज्ञापत्र तहसीलदार यांच्याकडील
 4. शाळा सोडल्याचा दाखला
 5. उमेदवार आरक्षण प्रवर्गातील असल्यास जातीचा दाखला
 6. उमेदवार सेविका पदासाठी किमान बारावी उत्तीर्ण असावा साक्षांकित गुणपत्रक
 7. आधार कार्ड
 8. रेशन कार्ड
 9. विधवा असल्यास पतीचा मृत्यूचा दाखला
 10. किमान वय 18 ते 35 वर्ष
 11. अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मिनी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असल्यास त्याचे प्रमाणपत्र

Anganwadi Bharti: अंगणवाडी सेविका, मदतनीस साठी अर्ज भरायला सुरू, कुठे आणि कसा करावा अर्ज, वाचा सविस्तर

Anganwadi Bharti अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना

 • अर्जदाराने अर्ज स्वतःच्या हस्ताक्षरात भरावा.
 • सोबत जोडलेले प्रमाणपत्र व दाखला यांच्या छायांकित प्रती झेरॉक्स साईज A4 पेपर मध्ये असाव्यात लहान पेपर मधील चालणार नाहीत.
 • ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदाचे नाव अर्जावर स्पष्ट उल्लेख केलेले असावे.
 • अंगणवाडी सेविका/मदतनीस/ मिनी अंगणवाडी सेविका या दोन्ही पदासाठी अर्ज करायचा असल्यास दोन्ही पदासाठी स्वतंत्र अर्ज करणे.
 • खडाखोड किंवा चुकीचे भरलेले अर्ज बाद केले जातील.
 • अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या क्रमांकावर राईट अशी खून करावी.
 • जमुन प्रमाणपत्राची कार्यालयाने मागणी केलेली नाही परंतु अशी कागदपत्रे अर्जासोबत जोडल्यास कार्यालयात त्याची जबाबदारी घेणार नाही.
 • अर्जासोबत जोडलेल्या साक्षांकित प्रति किंवा अन्य कागदपत्रे कोणत्याही परिस्थितीत उमेदवारास परत केली जाणार नाहीत.
 • अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे अथवा प्रमाणपत्रे नंतर भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर खोटी, बनावट, खडाखोड केलेली, अवैध, संबंधित शासन आदेश नियमानुसार जारी न केलेली अथवा सक्षम अधिकाऱ्यांनी प्राधान्य नकेलेले असल्याचे आढळून आल्यास प्रकल्प कार्यालयामार्फत घेण्यात येणाऱ्या निवडीपासून उमेदवारास कायमस्वरूपी बाद करण्यात येईल. याशिवाय उमेदवाराची शिफारस झाली असल्यास ती पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करण्यात येईल. तसेच इतरही कायदे शासन नियमानुसार कारवाई करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
 • सदर भरती प्रक्रिया दरम्यान कार्यालयावर कोणते प्रकारचा दावा आणण्याचा प्रयत्न केला सदर उमेदवाराचा अर्ज भरती प्रक्रियेमधून रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

1 thought on “Anganwadi Bharti: या जिल्ह्याचे अंगणवाडी सेविका मदतनीस साठी अर्ज सुरू, असा करा अर्ज”

Leave a Comment