Bal Jeevan Bima Yojana: फक्त 6 रुपये गुंतवा आणि 1 लाख मिळवा, पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना

Bal Jeevan Bima Yojana पोस्ट ऑफिस बाल जीवन विमा योजना पोस्ट ऑफिस ने लहान मुलांसाठी एक भन्नाट योजना आणली आहे या संदर्भातील सविस्तर माहिती पाहूयात.

Post Office Bal Jeevan Bima Yojana गेले किती वर्षापासून पोस्ट ऑफिस (Post Office) हे भारतामध्ये एक महत्त्वाचे व विश्वासाचे स्थान मानले जाते. नेहमीच पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना येत असतात व देशांमधील नागरिक योजनेचा लाभ घेत असतात. देशामधील प्रत्येक गावागावात पोस्ट ऑफिस त्यांच्या योजना चे सुविधा देते. पूर्वीपासूनच पोस्ट ऑफिस (Post Office) अजूनही गुंतवणूक करण्यासाठी एक सर्वोत्तम पर्याय मानला जातो. कारण की Post Office मध्ये तुमचे हक्काचे पैसे नेहमीच सुरक्षित असतात. या पैशाचा नागरिकांना परतावाही मिळतो.

हे असताना पोस्ट ऑफिस ना लहान मुलांसाठी एक भन्नाट विमा योजना आणली असून कमीत कमी गुंतवणूक करून जास्त परतावा मिळणार आहे. प्रत्येक पालकांना आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित असावे असे वाटते. लहान मुलांसाठी देशांमध्ये अनेक योजना उपलब्ध आहेत परंतु लहान मुलांसाठी देशांमधील विश्वासाचे असलेले पोस्ट ऑफिस एक पॉलिसी आणलेली आहे. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून मुलांचे भविष्य सुरक्षित तसेच पालकांना चांगला मोबदला मिळू शकतो.

या पोस्ट ऑफिसच्या योजनेने मुलांचे शिक्षण लग्न यासारखे मोठे खर्च पालक सहज भागू शकतात. आपण थोडी गुंतवणूक करून आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करू शकता. पोस्ट ऑफिसच्या या नवीन योजनेचे नाव आहे बाल जीवन विमा योजना. Bal Jeevan Bima Yojana

Post Office Bal Jeevan Bima Yojana वयोमर्यादा

पोस्ट ऑफिस बाल जीवन विमा योजना ही योजना अंतर्गत येते. या योजनेच्या माध्यमातून पाच ते वीस वर्षापर्यंतच्या मुलांचा जीवन विमा उतरवता येतो. कोणतेही पालक जास्तीत जास्त दोन मुलांसाठी घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेत असताना पालकाचे कमीत कमी होईल 45 वर्षापेक्षा कमी असावे. या पोलीस योजनेचा लाभ घेताना कोणती वैद्यकीय तपासणी केली जात नाही. ज्या दिवशी पासून आपण पॉलिसीचा लाभ घेताल त्या दिवशीपासून संरक्षण मिळण्यास सुरुवात होते. पॉलिसी दरम्यान पालकाचा मृत्यू झाल्यास प्रीमियम भरावा लागणार नाही. या योजनेअंतर्गत मॅच्युरिटी वर विमा रकमेसह बोनसही दिला जातो.

फक्त 6 रुपयाची गुंतवणूक करा आणि 1 लाख रुपयाचा विमा परतावा मिळवा

पोस्ट ऑफिस बाल जीवन विमा योजना (Bal Jeevan Bima Yojana) अंतर्गत मुलांसाठी सहा रुपये ते अठरा रुपये पर्यंतचा प्रतिदिन प्रीमियम जमा करू शकतात. जर एखाद्या पालकांनी ही पॉलिसी पाच वर्षासाठी घेतली तर त्याला दररोज सहा रुपये प्रीमियम भरावा लागणार. परंतु परंतु एखाद्या पालकांनी बाल जीवन विमा योजना ही पॉलिसी वीस वर्षाच्या कालावधीसाठी खरेदी केली तर अठरा रुपये दैनिक भरणा भरावा लागेल. या योजनेअंतर्गत तुम्ही मासिक क्रीमासिक सहामाही आणि वार्षिक आधारावरती प्रीमियम भरू शकता. या पॉलिसीच्या (Post Office Saving Schemes) अंतर्गत मॅच्युरिटी कालावधीनंतर 1 लाख रुपयांची विमा रक्कम दिली जाईल.

Post Office Scheme: पोस्ट ऑफिस योजना, ९५ रु. भरा आणि १४ लाख मिळवा.

किती विमा संरक्षण आणि काय फायदा होणार?

Post Office Schemes 2023: पोस्ट ऑफिस बाल जीवन विमा योजना (Bal Jeevan Bima Yojana) अंतर्गत जास्तीत जास्त तीन लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण दिले जाते. या योजनेमध्ये तुम्ही सोयीनुसार मासिक रीमासिक सहामाही आणि वार्षिक पेमेंटचा भरणा पर्याय निवडू शकता. बाल जीवन विमा योजना अंतर्गत 1000 रुपयाच्या विमा रकमेवर प्रति वर्ष 52 रुपये बोनस दिला जातो. पालकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन लवकरात लवकर आपल्या मुलांचा बाल जीवन विमा उतरून घ्यावा.

1 thought on “Bal Jeevan Bima Yojana: फक्त 6 रुपये गुंतवा आणि 1 लाख मिळवा, पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना”

Leave a Comment