Bandhkam Kamgar Yojana: एक रुपयात नोंदणी करा अन योजनांचा लाभ मिळवा

Bandhkam Kamgar Yojana महाराष्ट्र इमारत व’इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत कामगारांसाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर॒ कामगारांनी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी केवळ एक रुपया एवढे नाममात्र शुल्क घेतले जाते.

विकासात कामगारांचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून कामगार काम करीत असतात. कामाच्या तुलनेत त्यांना अतिशय कमी प्रमाणात मजुरी मिळते. त्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार Bandhkam Kamgar Yojana कल्याणकारी मंडळामार्फत विविध कल्याणकारी ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सेतूकेंद्रात जाऊन आपल्या नावाची नोंदणी करता येते.

नोंदणी कशी कराल Bandhkam Kamgar Yojana


महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या https://mahabocw.in/mr/31700-2/ या वेबसाईटवर कामगारांची नोंदणी करता येते.

Construction Worker: बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी करा या सोप्या पद्धतीने, मिळेल 36 योजनांचा लाभ

कोणती कागदपत्रे आवश्यक


नव्वद दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड टीसी जन्मदाखला बँक पासबुक शिधापत्रिका आवश्यक आहे.

नोंदणी शुल्क केवळ एक रुपयांमध्ये


ऑनलाइन नोंदणीसाठी केवळ एक रुपये एवढे ना मात्र शुल्क महामंडळामार्फत आकारले जाते त्यामुळे नोंदणीसाठी कोणीही पैसे मागत असेल तर कामगार कार्यालयाकडे तक्रार नोंदवा.

ग्रह कर्जासह विविध योजना


नोंदणी झाल्यानंतर संबंधित कामगाराच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती, आरोग्य सहाय्य, सामाजिक साह्य, आर्थिक सहाय्य अधि योजना राबविल्या जातात.

दरवर्षी नूतनीकरण करणे आवश्यक

योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर दरवर्षी नूतनीकरण करणे आवश्यक आहे अन्यथा संबंधित कार्य कामगारांना योजनेतील ला बंद केले जातील. कामगारांच्या नोंदणी प्रक्रिया ही नियमित सुरू असते यामध्ये बांधकाम कामगारांना शासनाच्या वतीने विविध योजनांचा लाभ दिला जातो दरवर्षी कार्ड अद्यावत म्हणजे नूतनीकरण करणे आवश्यक आहे.

1 thought on “Bandhkam Kamgar Yojana: एक रुपयात नोंदणी करा अन योजनांचा लाभ मिळवा”

Leave a Comment