Bhulekh Mahabhumi :जमिनीचा ७१२ व ८ अ उतारा काढा आपल्या मोबाईल वरून फक्त २ मिनिटात..

Bhulekh.Mahabhumi : जमिनीचा ७/१२ व ८ अ उतारा काढा आपल्या मोबाईल वरून फक्त २ मिनिटात.. 

712 kasa kadhava


मित्रांनो आपल्याला सातबारा वरील नोंदी तपासण्यासाठी, क्षेत्र तपासण्यासाठी किंवा पिक विमा भरण्यासाठी crop insurance तसेच अन्य कोणत्याही कामासाठी 7/12 ची आवश्यकता असते. पण हाच सातबारा काढण्यासाठी आपल्याला ऑनलाईन सर्व्हिसेसच्या दुकानावरती जावे लागते. 
पण आता आपण आजच्या टॉपिक मध्ये पाहणार आहोत की bhulekh.mahabhumi आपण घरी बसल्या आपला  सातबारा पाहायचा असेल किंवा आठ तपासायचा असेल तर ऑनलाइन पद्धतीने आपण आपल्या मोबाईल वरुन एकदम सहजरीत्या तो पाहू शकतो. get 712 आणि त्याला साठवून हि मोबाईल मध्ये करून ठेवू शकतो. आपण महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील गावाचा सातबारा व आठ नमुना हा काढू शकतो. bhumiabhilekh 
712  व 8अ कसा काढायचा याची सविस्तर माहिती पाहुयात:

प्रथम आपल्याला खालील दिलेल्या लिंक वर ती क्लिक करायचे आहे.

👉सातबारा काढण्यासाठी येथे क्लिक करा. 

त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला खालील प्रमाणे एक पेज ओपन होईल. 👇
Bhumiabhilekh

त्यामध्ये आपल्याला विभाग निवडा हा पर्याय त्या ठिकाणी दिसेल, त्यामध्ये आपल्याला आपल्याला ज्या विभागाचा सातबारा पाहायचा असेल तो विभाग निवडायचा आहे, उदाहरणार्थ त्या ठिकाणी अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे, अशा पद्धतीचे 6 विभाग दिलेली आहेत. आपला जिल्हा ज्या विभागात येतो तो विभाग आपल्याला याठिकाणी निवडायचा आहे. Crop insurance विभाग निवडल्यानंतर याठिकाणी go नावाचे एक बटन आहे त्यावर ते आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला खालील प्रमाणे पुन्हा एक नवीन पेज आपल्या समोर दिसेल. 
Bhulekh.mahabhumi

आता त्यामध्ये आपल्याला ज्या जिल्ह्यातील गावाचा सातबारा काढायचा आहे, तो जिल्हा त्यानंतर तालुका त्यानंतरच आपलं गाव निवडायचे आहे. 
त्यानंतर आपला सातबारा आपण गट नंबर किंवा आपले पहिले नाव किंवा मधील नाव किंवा आपल्या आडनाव तसेच संपूर्ण नाव या वरून पाहू शकतो. जर आपल्याला आपला गट नंबर माहित नसेल तर आपण आपले पहिले नाव टाकून ही सातबारा चेक करू शकतो.
समजा आपल्याला गट नंबर माहित आहे, गट नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर शोधा या पर्यायावर ती क्लिक करायचा आहे.
या पर्यायावर क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला आपला गट नंबर दिसेल त्यामध्ये तो निवडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपला दहा अंकी मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा खालीलप्रमाणे
712 Utara
आपला मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर त्या ठिकाणी ७१२ पहा हा पर्याय दिसेल त्यावर ती आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर एक नवीन पेज आपल्यासमोर ओपन होईल  खालील प्रमाणे असेल…
mahabhumi
त्या पेज वरील जो कॅपच्या कोड दिसत आहे. तो कॅपच्या कोड आपल्याला जसा तसा समोरच्या बॉक्समध्ये टाकायचा आहे. वरीलप्रमाणे आणि त्यानंतर Verify Captcha to view 712 या पर्याय  वरती क्लिक करायचे आहे.
आता आपल्या समोर आपण जो गट नंबर निवडला होता त्या गट क्रमांकाचा सातबारा आपल्यासमोर ओपन झालेला आपल्याला दिसेल. 
अशाच पद्धतीने सुरुवातीला आपण विभाग निवडल्यानंतर जे तेज आपल्या समोर ओपन झालते त्याठिकाणी सातबारा समोर 8 आठ अ उतारा काढण्यासाठी एक पर्याय आहे. bhumiabhilekh त्या ठिकाणाहून अशीच सर्व प्रोसेस करून आपण आपला 8अ उतारा ही काढू शकतो.
टिपः bhulekh.mahabhumi.gov.in हे पोर्टल फक्त सातबारा व आठ नमुना पाण्यासाठी आहे याची प्रिंट करून आपण कोणत्याही शासकीय कामासाठी वापरू शकत नाही याची नोंद घ्यावी. 

वरील  माहिती कशी वाटली हे कमेंट करुन नक्की कळवा तसेच आपल्या शेतकरी बांधवांना तसेच मित्रांना शेअर करण्यास विसरू नका धन्यवाद..🙏🏻

अशाच माहितीसाठी खालील लिंक वरून आमच्या WhatsApp व Telegram ग्रुप मध्ये जॉईन व्हा. 

👉 जॉईन  WhatsApp group

👉 जॉईन  Telegram Group

 

Leave a Comment