Cotton Rate: कापसाचे दर का कमी झालेत?

Today-Cotton-Price-in-India


आंतरराष्ट्रीय बाजारात आज कापसाचे दर ( Cotton Rate) जवळपास साडेतीन टक्क्यांनी कमी होते. तर देशातील वायदे बाजारातही कापसाचे दर ( Today Cotton Rate) कमी झाले होते त्यामुळे बाजार समितीमध्ये ही कापसाचे दर तुटले होते. पण आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर काय नरमले, देशातील बाजारात कापूस दर किती कमी झाले, कापसाला काय दर मिळू शकतो, याची माहिती आपण आज या टॉपिक मध्ये पाहणार आहोत.

आंतरराष्ट्रीय बाजारात मागील पाच दिवसांमध्ये कापसाचे दर जवळपास दहा टक्क्यांनी कमी झाले. (Today’s Cotton Price in India) चालू हंगामात जागतिक कापूस उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यातच चीनची अर्थव्यवस्था कोरोनाच्या जोकड्यातून मुक्त होण्याची आशा निर्माण झाली आहे. चालू हंगामात सुरुवातीपासूनच कापसाचे दर (Cotton Rate) आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिर राहिले.पाच दिवसांपूर्वीचे म्हणजेच 16 नोव्हेंबरला सी बोर्ड वर कापसाचे व्यवहार 90.25 सेंट होते. त्यात नरमाई येत गेली. आज कापसाचे वायदे  81.27 प्रति पाउंड वर आले. देशातील कापसाचे वायदेही आज अडीच टक्क्यांनी तुटले होते. मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात एमसीएक्स वरती कापसाच्या वायद्यांमध्ये आज गाठी मागे 780 रुपयांची घसरण झाली. (cotton rate today maharashtraएक गाठ १७० किलो रुईची असते आज 31 हजार 380 प्रतिगाठीन डिसेंबर चे वायदे पार पडले.


तर नोव्हेंबर चे फायदे ६७० रुपयांनी घसरून 32 हजार 240 रुपये वर बंद झाले. आंतरराष्ट्रीय वायदे (cotton rate today) बाजारात घसरण झाल्याचा परिणाम देशातील कापूस दरावर झाल्याचं शेतीमाल बाजार विश्लेषक सुरेश मंत्री यांनी सांगितलं. 


सुरेश मंत्री काय म्हणाले?

 

आंतरराष्ट्रीय चलन बाजारात डॉलर मजबूत झालेल्या कापसाच्या दरात नरमाई दिसली. डॉलर इंडेक्स (International Cotton Rate) मजबूत होतोय याचा परिणाम अमेरिकेच्या कापूस दरावर होतोय. डॉलरचा दर वाढल्यास अमेरिकेचा कापूस महाग होतो पण आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा दर कमी झाल्याचा परिणाम देशातील वायदे बाजारावरही जाणवला. 


तिकडे वायद्यांमध्ये कापूस धरल्यानंतर बाजार समित्यांमध्ये कापसाचे दर (Today Cotton Price in Indiaकाहीसे कमी झाले होते मात्र कापसातील तेजी अध्यापही टिकून आहे. देशातील अनेक बाजारांमध्ये आज कापसाच्या दरात क्विंटल मागे दोनशे ते तीनशे रुपयांची नर्माई दिसून आली होती. कापसाचा सरासरी दर हा 8600 ते 8800 रुपयांच्या दरम्यान टिकून आहे. (cotton market price today) तर अनेक बाजारांमध्ये कमाल धर 9600 रुपये मिळाला. सध्या दर काहीसे नरमलेत मात्र देशात यंदा उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यातच मागील हंगामातील खूपच कमी कापूस शिल्लक आहे. त्यामुळे कापसाचे दर जास्त नरमण्याची शक्यता तशी कमी आहे.


शेतकऱ्यांना यंदा सरासरी 9000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच कापसाची विक्री करावी असं आवाहन जाणकारांनी केले आहे. 

याबद्दल तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या भागात कापसाला कायदर मिळतोय, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. ताज्या अपडेट साठी आमचा व्हॉट्सॲप ग्रुप नक्की जॉईन करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.


माहिती महत्त्वाची वाटली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर नक्की करा.


 

Leave a Comment