Cotton Rate: कापूस दर कधी वाढतील? कापूस दर वाढीत काय आहे अडथळा?

Cotton Rate


जागतिक पातळीवर कापूस दबावात आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात पुढील काळात कापसाला मागणी वाढण्याचा अंदाज असल्याने घरालाही आधार मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्पे टप्प्याने कापूस विक्री केल्यास फायदेशीर ठरेल असं जाणकार सांगतात. मात्र कापसाला मागणी का कमी आहे कापसाला मागणी कधी वाढेल शेतकऱ्यांना त्या काळात काय दर मिळेल याची माहिती तुम्हाला या टॉपिक मिळणार आहे.

तर देशात यांना अपेक्षेपेक्षा कमी कापूस उत्पादन राहूनही दर ( Cotton Rate) काहीसे दबावात दिसत आहेत. जागतिक बाजारातील (International Cotton Rate) घडामोडींचा परिणाम देशातील कापूस बाजारावर होतोय. जागतिक कापड बाजाराचा विचार करता मागणी अद्यापही पूर्ण पातळीवर आलेली नाहीये. अनेक देश सध्या मागायला कोण देत आहेत त्यामुळे सप्टेंबर महिन्यातही जागतिक कापड मागणी कमी राहिली त्याचा परिणाम बाजारावर दिसून आला.  आशियातील स्थिती काहीशी चिंताजनक होती. कापड बाजारातून मागणी कमीच असली तरी विचारना मात्र वाढली. 

हे पण वाचा: रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी, या धारकांना मिळणार नाही रेशन, रेशन कार्ड होणार रद्द!


त्यामुळे पुढील काळात मागणी ही वाढू शकते अशी आशा निर्माण झाली आहे. सप्टेंबर महिन्यात अमेरिका आणि युरोपियन युनियन मधून काही प्रकारच्या कपड्यांना मागणी वाढली होती. तर भारतात दिवाळीच्या सणामुळे कापड बाजाराला उभारी मिळाली यंदा दिवाळी ऑक्टोबर मध्येच आली त्यामुळे कापूस अवस्थेचा हंगामात कापडालाही उठाव मिळतोय. ऑक्टोबर महिन्यातील कापडाची मागणी जास्तच असेल त्याचा तपशील पुढील महिन्यातील तर आंतरराष्ट्रीय बाजारातही पुढील महिन्यापासून कापडाला उठाव मिळण्याची शक्यता आहे. असं झाल्यास कापसाला ही मागणी वाढेल या काळात कापूस दराला (Cotton Rate) आधार मिळेल असं जाणकार सांगतायेत. देशात दिवाळी आणि रब्बीच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी कापूस विक्री केल्याचे दिसते दिवाळीच्या आधी 10 ते 15 दिवस कापसाचे आवक जास्त होती. दरवर्षी दिवाळीच्या काळात बाजारातील आवक जास्त असते शेतकऱ्यांची नड लक्षात घेऊन व्यापारी अनेकदा दर दबावत ठेवतात यंदाही बाजारातील आवक वाढल्यानंतर दर दबावात घेत गेले. 

यंदाही बाजारातील आवक वाढल्यानंतर दर दबावत येत गेले सध्या देशात कापसाला प्रतिक्विंटल 7000 ते 9700 रुपये पर्यंत दर मिळतोय कापसाचे दर सध्या दबावत असले तरी जागतिक बाजारात कपड्याला मागणी वाढल्यानंतर कापसाचे ही दर सुधारू शकतात. नोव्हेंबरच्या शेवटी आणि डिसेंबर मध्ये कापूस बाजाराला आधार मिळू शकतो. सध्याची परिस्थिती पाहता डिसेंबर मध्ये मागणी वाढली तर शेतकऱ्यांना सरासरी 9000 रुपये दर मिळू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री करावी असा आव्हान जानकरानी केले आहे.

हे पण वाचा : आपल्या ग्रामपंचायत मध्ये कोणत्या नवीन योजना आल्या? आणि कोणत्या नागरिकांना त्याचा लाभ मिळाला पहा ऑनलाईन.

Leave a Comment