Cotton Rate Today: आजचे कापुस बाजार भाव, आता जास्त वाट पाहू नका, देऊन टाका

Cotton Rate Today: शेतकऱ्यांच्या पांढरे सोन्याला पुन्हा सोन्यासारखा भाव आलेला आहे. मागील काही दिवसापासून कापसाचे भाव खूप कमी झाले होते परंतु कापसासंदर्भात शेतकऱ्यांसाठी आता एक सुवर्णसंधी व खुशखबर आहे. Ajache Kapus Bajar Bhav

शेतकरी मागील 3 महिन्यापासून कापूस बाजार भावामुळे खूप चिंतेत होते व त्यांच्याकडे सरकारनेही कसल्याही प्रकारचे लक्ष दिले नाही हे देखील स्पष्ट आहे. परंतु बाजारांमधील जे भावा बाबतीत कमी जास्त चालले होते ती संधी आता निघून गेली आहे. आपल्या कापसाला चांगला भाव मिळेल यामुळे महाराष्ट्रामधील भोळा भाबडा शेतकरी भाव वाढतील या चिंतेने डोळे लावून बसला होता. Cotton Rate Today

व्यापारी देखील कमीत कमी पैशांमध्ये शेतकऱ्यांना कापूस मागत होते. घरामध्ये अनेक दिवसापासून कापूस दाबून ठेवल्यामुळे शेतकरी देखील मोठ्या चिंतेत होते. लहानांपासून तर थोरांपासून पर्यंत या कापसामधील किडे शेतकऱ्यांना खूप त्रासदायक होते. कातड्यांचा रोग झाल्यासारखे शेतकऱ्यांच्या हातापायांना व शरीरावर खाज येत होती. कापूस तसा सांभाळायला देखील कठीण व आग लागल्यावर ते सांभाळणे देखील कठीण मग राखच हातात येते त्याची देखील अजूनही काळजी. Cotton Rate Today

Cotton Rate Today: शेतकरी बांधवांनो आता जास्त भावाची अपेक्षा ठेवू नका, देऊन टाका

सध्या उन्हाळा खूप जास्त आहे यामध्येच उष्णता जास्त वाढत जात असल्यामुळे घरात ठेवलेला कापूस वजनही कमी होत चाललेला आहे. कापूस न विकल्यामुळे शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत दोन महिन्या घरामध्ये पावसाळा पण येत आहे हातात पैसे नसल्याने शेतीची ही कामे कशी करावी हे देखील शेतकऱ्यांना कळत नाही तेव्हा आता कापूस दर वाढी संदर्भात शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे आता जास्त भावाची अपेक्षा न ठेवता शेतकरी बांधवांनो आपल्या घरामध्ये दाबून ठेवलेला कापूस देऊन टाका. हीच भूमिका शेतकऱ्यांना परवडणार आहे. Cotton Rate Today

कारण की मे महिन्यामध्ये अनेक कापसाच्या जिनिंग या हवा आणि आगीच्या घटना ओव्या नाहीत म्हणून बंद करतात. कापसाचे सीजन देखील संपायला येत आहे या कारणामुळे आधीच काही शेतकरी कापूस विकतात हीच भूमिका शेतकऱ्यांना परवडणारी आहे कापूस घरामध्ये दिवसेंदिवस ठेवून उष्णता वाढली तर कापसाचे वजन घटते घरामध्ये ओढ लागली किंवा अवकाळी पावसामुळे कापूस खराब होण्याची जास्त भीती असते म्हणून कापूस विकून हातात पैसे आल्यावर इतर शेतीच्या कामाकडे शेतकऱ्यांना लक्ष देणे परवडते.

आजचे कापुस बाजार भाव 12 एप्रिल राज्यामध्ये कापसाला कोणत्या बाजार समितीमध्ये किती भाव मिळाला पहा सविस्तर

सध्या स्थितीला बाजारामध्ये कापसाची आवक खूप कमी आहे म्हणजेच कापसाची मागणी आहे व आवक कमी झालेली आहे नागपूर जिल्ह्यामधील उमरेड मध्ये कापसाला सर्वात जास्त आवक झाली आहे. नागपूर येथील उमरेड बाजार समितीमध्ये ११३० क्विंटल कापसाची आवक झाली. वर्धा जिल्ह्यामध्ये कापसाला आज सर्वाधिक जास्त भाव मिळाला वर्धा जिल्ह्यातील आज प्रति क्विंटल आठ हजार तीनशे रुपये कापसाला भाव मिळाला तर सरासरी हा भाव सात हजार तीनशे रुपये असा होता. किनवट उमरेड भद्रावती काटोल येथे कापसाला सरासरी आठ हजार रुपये क्विंटल च्या आसपास भाव होता ही शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे.

राज्यामधील महत्त्वाच्या बाजार समिती मध्ये कापसाला आज भाव कसा होता पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment