Cotton Rate : कापूस व सोयाबीन विषयी फडणवीसांच्या वाणिज्य मंत्री पियुष गोयलांना पत्राद्वारे मागण्या.

Cotton Rate : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तुपकर यांनी यासंदर्भात काही मागण्या आणि सूचना या पत्रामध्ये नमूद केले आहेत. आणि या मुद्द्यांवर निर्णय झाल्यास महाराष्ट्रामधील कापूस उत्पादक ( Cotton Farmer) आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे असे देवेंद्रजी फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी या पत्रामध्ये नमूद केलं.

  • कापूस सुत, सोया पेंड निर्यातीला प्रोत्साहन द्यावे,
  • यंदा 2023 मध्ये 15 लाख मॅट्रिक टन सोया पेंड निर्यात करावी.
  • खाद्यतेलावरील जे काही आयात शुल्क आहे ते 30 टक्के करावे.
  • कापसाचे आयात शुल्क सध्या स्थितीला अकरा टक्के आहे ती आयात शुल्क तसेच कायम ठेवावे.
  • जीएम सोयाबीनच्या पेरणीला परवानगी द्यावी तसेच सोयाबीन वरील पाच टक्के असणारी जीएसटी रद्द करावी.
  • पीक कर्जासाठी क्रेडिट स्कोर म्हणजेच सिबिल ची आठ रद्द करावी.

वरील सर्व मागण्या या पत्रामध्ये पडून विसांनी नमूद केलेल्या आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी पियुष गोयल यांनी पाठवलेल्या या पत्रामध्ये रविकांत तुपकर यांच्या नावाचा देखील उल्लेख केला आहे. यामध्ये ते तूपकरांच्या मुद्द्यांचा केंद्र शासनाने गांभीर्याने विचार करावा, असे देखील देवेंद्रजी ( Devendra Fadanvis ) यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारने केंद्राकडे या मागण्यांबाबत जर पाठपुरावा केला तर सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्राकडून न्याय मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे असे रविकांत तुपकर यावेळी एबीपी माझा सोबत बोलताना म्हणाले.