Cow Buffalo Subsidy आता गाई म्हशी खरेदी करण्यासाठी मिळणारा अनुदान. असा करा ऑनलाईन अर्ज

Cow Buffalo Subsidy मित्रांनो पशुसंवर्धन विभागाच्या (Animal Husbandry) नाविन्यपूर्ण योजनेतून 2023 (Navinya Purna Yojana 2023) मध्ये राज्यातील 28 जिल्ह्यांमधील 17704 शेतकऱ्यांना दुधाळ गट योजनेतून गाय म्हशी खरेदीसाठी अनुदान देण्यात येणार आहे आणि त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुरू आहेत.

महाराष्ट्र राज्यामध्ये शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेतकरी दूध व्यवसाय करत असतात त्यामुळे महाराष्ट्र शासनाने पशुसंवर्धन विभागांतर्गत गेल्या बऱ्याच वर्षापासून दोन गाई आणि दोन म्हशी Cow Buffalo Subsidy खरेदी करण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनेमार्फत शेतकऱ्यांना दोन गाई किंवा दोन म्हशी खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते.

ही योजना सर्वसाधारण अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अशा तीनही घटकातील प्रवर्गासाठी राबवली जाते. या योजनेमधून रक्कम 87 हजार पाचशे रुपये निश्चित केली आहे. Cow Buffalo Subsidy तसेच दुधाळ गट योजनेत निवड झालेल्या सर्वसाधारण लाभार्थ्याला 50 टक्के अनुदानावरती म्हणजेच 43 हजार 750 रुपये तसेच अनुसूचित जाती व जमाती मधील लाभार्थ्याला 75 टक्के अनुदानावर 65 हजार 625 रुपयांचे या योजनेमार्फत दोन गाई किंवा दोन म्हशी खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते.

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभासाठी ऑनलाइन अर्ज सुरू आहे. (Navinya Purna Yojana 2023)

चालू वर्षी राज्यामधील तीनही प्रवर्गातील म्हणजेच सर्वसाधारण अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या तिन्ही प्रवर्गातील मिळून 17704 लाभार्थ्यांना या योजनेमध्ये लाभ देण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे. चालू वर्षी नव्याने 11 जानेवारी पर्यंत अर्ज करता येणार आहे म्हणजेच यापूर्वी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांकडून पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही अर्ज करण्याची शेवटच्या दिनांक 11 जानेवारी पर्यंत असणार आहे असे पशुसंवर्धन विभागाकडून कळविण्यात आले.

(Navinya Purna Yojana 2023)

दोन गाई किंवा दोन म्हशी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा पाहण्यासाठी येथे क्लिक करा

2 thoughts on “Cow Buffalo Subsidy आता गाई म्हशी खरेदी करण्यासाठी मिळणारा अनुदान. असा करा ऑनलाईन अर्ज”

Leave a Comment