Crop Insurance: कृषी खात्याच्या तपासणी मध्ये अनेक पिक विमा अपात्र अर्ज बाद, अपात्र अर्जावर कठोर कारवाईचे आदेश

Crop Insurance: राज्याचे कृषिमंत्री माननीय धनंजय मुंडे यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये केवळ पात्र शेतकऱ्यांनाच लाभ मिळावा यासाठी योग्य वेळी अर्जाची छाननी करून शेतकऱ्यांना पिक विमा लाभ द्यावा असे आदेश कृषी खात्याला दिले आहे. यानुसार कृषी आयुक्तांनी राज्यांमध्ये सर्व विमा कंपन्यांना संबंधित अधिकाऱ्यामार्फत अर्जाची छाननी करण्याचे आदेश दिले आहे. या छाननीमुळे आता अनेक अपात्र अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. यामुळे पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. Crop Insurance या योजनेचा लाभ केवळ पात्र शेतकऱ्यांनाच मिळावा यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुदतीसह अर्जांची कसून तपासणी करण्याचे आदेश दिले.

या तपासणीच्या परिणामी, अनेक अपात्र अर्ज नाकारण्यात आले आहेत. यामुळे योजनेतून लाभ मिळवण्याची प्रक्रिया अधिक कडक झाली आहे. कृषी आयुक्तांनी राज्यातील विमा कंपन्यांना सर्व अर्जांचे काळजीपूर्वक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. या छाननीमुळे केवळ पात्र शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळेल याची खात्री करून असंख्य अर्ज बाद कारण्यात आले आहेत.

31 ऑगस्ट 2023 रोजी कृषी आयुक्तांनी पिक विमा कंपन्यांना एक पत्र दिले असून त्यामध्ये सतर्कता बाळगण्यात यावी अशा सूचना दिले आहे. एखाद्या शेतकऱ्याच्या नावे परस्पर जमिनीवर दुसऱ्या शेतकऱ्याने किंवा एखाद्या व्यक्तीने विमा काढणे तसेच वनविभाग सिंचन विभाग विद्युत महामंडळ औद्योगिक क्षेत्र या शासकीय शासकीय जमिनीवर विमा भरणे, महानगरपालिका नगरपालिका अ कृषी क्षेत्रावर विमा भरणे, मस्जिद मंदिर इत्यादी धार्मिक शाळेच्या जमिनीवर विमा भरणे तसेच काही सार्वजनिक संस्थावर जमिनीच्या नावे विमा भरणे, सातबारा किंवा आठ वरील क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर विमा भरणे या सर्व विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश कृषी आयुक्तांनी दिले आहेत.

Crop Insurance शिवाय, योजनेचा गैरवापर टाळण्यासाठी अनेक कृती केल्या आहेत, जसे की:

  • प्रत्यक्षात लागवड न झालेल्या पिकांच्या विमा भरणे.
  • बोगस भाडेकरार दाखून दुसऱ्या शेतकऱ्याच्या जमिनीवर विमा भरणे.
  • सामायिक क्षेत्रावर इतर खातेदाराची संमती नसताना परस्पर विमा उतरविणे.
  • एकाच बँक खात्यावर अनेक शेतकऱ्यांचा विमा भरणे.

असे गैरप्रकार होत असल्यामुळे सर्व संबंधित तालुका, जिल्हा कृषी अधिकारी यांच्यामार्फत सर्व अर्जांची सखोल तपासणी करावी आणि चुकीच्या पद्धतीने विमा योजनेत सहभाग घेणाऱ्या व्यक्ती यांचे अर्ज रद्द करून (crop insurance) त्याविरुद्ध कडक कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले.

Crop Insurance विमा अर्ज करण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे?

पिक विमा अर्ज ऑनलाईन सादर करण्यासाठी शासनाने व पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांसाठी एक स्वतंत्र पोर्टल तयार करून दिलेले आहे. या पोर्टलवर शेतकरी आपल्या स्वतःच्या क्षेत्राची नोंद करून पिक विमा भरतो आणि त्यानंतर अर्ज सादर झाल्यानंतर त्याची पडताळणी केली जाते. या पडताळणी केल्यानंतर जे अर्ज बनावट किंवा खोटे आहेत अशा पिक विमा अर्जाचा हप्ता शासनाकडून भरला जात नाही व ती अर्ज रद्द केले जातात.

ऑनलाइन अर्ज सादर करतेवेळी शेतकऱ्यांच्या पीक क्षेत्राची पडताळणी केली जाऊ शकत नाही या कारणामुळे पिक विम्याची अर्ज सादर झाल्यानंतर या अर्जाची तपासणी करण्यात येते. या कारणास्तव कोणत्याही शेतकऱ्यांनी कुठूनही कोणत्याही क्षेत्राचा पिक विमा भरला तरी त्या क्षेत्रावर पीक आहे किंवा नाही याची पडताळणी झाल्यानंतरच शासन पीक विम्याची रक्कम कंपन्यांना अदा करते. प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिकाची पेरणी करताना, मध्यम हंगाम प्रतिकूल परिस्थिती आणि पिकाच्या काढणी पश्चात आधी अशा पाच वेगवेगळ्या टप्प्यावर संरक्षण देण्याची शासनाची जबाबदारी असते.

Leave a Comment