Crop Loan: शेतकऱ्यांना मिळणार 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज या तारखेपासून होणार वाटप सुरू mh Shetkari

Crop Loan: शेतकऱ्यांचा शेतीसाठी खूप मोठा खर्च असतो. शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना नेहमीच पैशाची कमतरता भासते. त्यासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज बँकेकडून मिळावे यासाठी मोठी आशा असते. शेतकरी त्याच्या शेतातील पिकावर हे पीक (Apply for Crop Loan) कर्ज काढू शकतो. आता शेतकऱ्यांना बिनव्याजी पीक कर्ज (Interest free Crop loan) मिळणार आहे. पिक कर्ज बाबत नवीन माहिती समोर आलेली आहे. कधी मिळणार पीक कर्ज व कोणत्या तारखेपासून वाटप सुरू होणार आहे याविषयी माहिती पाहूया.

शेतकऱ्यांना मिळणार बिनव्याजी कर्ज (Farmers will get interest free loan)


1 रुपयापासून ते 3 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज Crop Loan शेतकऱ्यांना 2019 सालापासून बिनव्याजी रूपात दिले जात आहे. शेतकऱ्यांसाठी 1 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज हे राज्य शासन देते तर 1 लाख ते 3 लाख रुपयापर्यंतचे कर्ज हे केंद्र शासन बिनव्याजी स्वरूपात देते. शेतकऱ्यांना हे कर्ज खाजगी बँका तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून दिले जाते.

एवढेच नाही तर विहित कालावधीच्या आत मध्ये जर शेतकऱ्यांनी कर्जाची पडत केली तर कर्जाच्या व्याजाची रक्कम शेतकऱ्यांना अनुदान म्हणून दिली जाते. जर एखाद्या शेतकऱ्याने 31 मार्च अगोदर आपल्या पीक कर्जाची परतफेड केली तर त्या शेतकऱ्यांना पुन्हा नवीन पीक कर्ज दिले जाते. जर एखाद्या शेतकऱ्यांनी विहित कालावधीच्या आत मध्ये जर आपल्या कर्जाची परतफेड केली नाही तर अशा वेळेस त्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी इतर बँक टाळाटाळ करत असतात.

Farmer Loan Waiver: नियमित कर्जदार प्रोत्साहन अनुदान साठी 1014 कोटीचा निधी मंजूर

या तारखेपासून सुरू होणार पीक कर्जाचे वाटप Distribution of Crop Loans

यावर्षीचे पीक कर्ज म्हणजेच 2023 या वर्षाचे पीक कर्ज Crop Loan हे 1 एप्रिल 2023 पासून सुरू होणार आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज हे जिल्हास्तरीय बँक व सहकारी बँक यांच्या माध्यमातून दिले जाणार आहे. जे शेतकरी विहित मुदतीच्या आत मध्ये आपल्या पीक कर्जाची परतफेड करतील अशा शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

Leave a Comment