Crop Loan: पीक कर्जासाठी CIBIL स्कोर मागणाऱ्या बँकेवर FIR दाखल करा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

Crop Loan: सरकारने शेतीसाठी पिक कर्ज योजना आणली, मात्र बँकांच्या कडक निकषांमुळे शेतकरी पुन्हा एकदा आत्महत्येच्या उंबरठ्यावर ढकलला गेला आहे. याप्रकरणी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा बँकांवर एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

अमरावतीत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा बँकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या शेतकऱ्यांना कृषी कर्जासाठी क्रेडिट स्कोअर विचारतात. आजच्या बैठकीत बँकांनी कृषी कर्जासाठी क्रेडिट स्कोअर मागितल्यास त्यांच्यावर एफआयआर दाखल करा, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

CIBIL Score म्हणजे काय? Crop Loan

कर्जाची नियमित परतफेड CIBIL द्वारे रेकॉर्ड आणि ट्रॅक केली जाते. किमान 600 ते 700 CIBIL स्कोअर असलेले शेतकरी बँकांमार्फत कर्ज घेऊ शकतात. (crop loan eligibility) रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, CIBIL स्कोअर आता (Crop Loan) पीक कर्ज, मध्यम-मुदतीचे कर्ज आणि दीर्घकालीन कर्जासाठी लागू आहे. बँकांकडून पीक कर्ज मिळविण्यासाठी 7/12 उतारा, 8A, 6-D, पॅन कार्ड आणि आधार कार्ड यासारखी कागदपत्रे आवश्यक आहेत.

एखाद्या शेतकरी किंवा मजुराने कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतले असेल किंवा एखाद्यासाठी जामीनदार बनला असेल, तर बँक आता “सिबिल” प्रणालीद्वारे त्यांची संपूर्ण माहिती मिळवू शकते. या माहितीमध्ये त्या व्यक्तीकडे कोणत्या बँकेची थकबाकी आहे आणि त्यांनी नियमितपणे कर्जाची परतफेड केली की नाही याचा समावेश आहे. जर त्यांनी कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतले असेल आणि त्यांचा नियमित परतफेड असेल तर ते कर्जासाठी पात्र आहेत. ज्यांची थकबाकी आहे ते कर्जासाठी पात्र असणार नाहीत.

Apply Crop Loan

Leave a Comment