DBT For Ration : शेतकऱ्यांना राशन ऐवजी मिळणार पैसे, शासन निर्णय जाहीर

DBT For Ration मित्रांनो राशन ऐवजी आता थेट रकमेचे वितरण आपल्या खात्यामध्ये केले जाणार आहे त्या संदर्भात एक शासन निर्णय आज दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. नेमका काय आहे शासन निर्णय, कोणते जिल्हयातील लाभार्थी यासाठी पात्र होणार, किती अनुदान खात्यामध्ये मिळणार व ही रक्कम मिळण्यासाठी अर्ज कसा भरायचा या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आज या लेखामध्ये पाहणार आहोत.

बऱ्याच दिवसापासून यासंदर्भात चर्चा सुरू होती की शेतकऱ्यांच्या खात्यावरती राशन ऐवजी रक्कम वितरित केली जाणार. मित्रांनो अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत सर्व राशन कार्ड धारकांना रेशन दिले जातं. परंतु शेतकऱ्यांच्या कार्डावरती जे रेशन दिले जातं त्यामध्ये पुरेसा गहू आणि तांदूळ उपलब्ध नसतो यामुळे गेल्या बऱ्याच दिवसापासून या शेतकऱ्यांचे रेशन वितरित DBT For Ration केले जात नव्हते.

याच आधारे हा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन राज्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या केसरी राशन कार्ड वरती अन्नधान्य बंद करून त्या राशन कार्ड धारकांना प्रतिमा हा 150 रुपये प्रति लाभार्थी इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तरणाची डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर Direct Benifit Transfer Ration याप्रमाणे हे अनुदान वितरित करण्यासाठी या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे.

DBT For Ration

या निर्णयामुळे प्रत्येक रेशन कार्ड वरील प्रति लाभार्थी यांचे आधार संलग्न झालेले आहे अशा लाभार्थ्यांना 150 रुपये प्रति लाभार्थी अशा प्रमाणामध्ये हे अनुदान DBT For Ration वितरित केले जाणार आहे. यासाठी मार्गदर्शक सूचना या शासन निर्णय मार्फत दिल्या गेले आहेत. याचा लाभ घेण्यासाठी राशन लाभार्थ्यांना एक विहित नमुन्या मधील अर्ज भरून द्यावा लागणार आहे त्या अर्जाची लिंक आपल्याला लेखाच्या शेवटी मिळेल.

अर्ज नमुन्यामध्ये औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील केसरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना अन्नधान्य ऐवजी थेट रोख रक्कम DBT For Ration हस्तारण योजनेचा लाभ मिळवण्याकरता अर्जाचा नमुना या अर्जामध्ये आपल्याला अर्जदाराचे कुटुंब प्रमुखाचे नाव व पत्ता द्यायचा आहे. त्यानंतर आपला शिधापत्रिका क्रमांक हा शिधापत्रिका क्रमांक ऑनलाईन मिळेल तो हा या अर्जावरती टाकायचा आहे.

जर आपल्याला शिधापत्रिका क्रमांक माहीत नसेल तर तो कसा काढायचा यावरती आपण या अगोदरच एक लेख लिहिलेला आहे त्याची लिंक पुढीलप्रमाणे

Ration Card Number: रेशन कार्ड चा ऑनलाईन १२ अंकी SRC नंबर काढा घरी बसल्या मोबाईल वरून


शिधापत्रिका क्रमांक टाकल्यानंतर कुटुंबप्रमुखाच्या वैयक्तिक बँक खात्यास खाते क्रमांक शाखेचे नाव, खात्याचा प्रकार, आयएफएससी कोड ही सर्व माहिती भरून त्या अर्जावला आपल्याला आपले राशन कार्ड ची एक झेरॉक्स तसेच बँक पासबुकची झेरॉक्स जोडून आपल्या तहसील कार्यालय येथे सादर करायचे आहे.

याच्या अंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत अर्ज भरलेल्या लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी 150 रुपये प्रति महिना प्रमाणे रक्कम वितरित केली जाणार आहे. या अनुदान वितरण करण्यासाठीं 60 कोटीच्या निधीची मंजुरीही देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर बऱ्याच दिवसापासून चर्चेत असलेला हा विषय यासाठी शेतकऱ्यांना आता या अनुदानाचे वितरण केले जाणार आहे. या संदर्भातील महत्त्वपूर्ण शासन निर्णय मंजूर झालेला आहे.

शासन निर्णय व अर्ज नमुना येथून डाउनलोड करा

Leave a Comment