E-Peek Pahani : ई-पीक पाहणी मध्ये झाले मोठे बदल, पहा नवीन शासन निर्णय

e pik pahani version 2 apk download
e pik pahani

E-Peek Pahani शेतकऱ्यांना स्वतःच्या सातबारे वरती नमुना 12 मध्ये आपल्याला लागवड केलेल्या शेतातील पिकांची नोंद करण्याचे तरतूद अर्थात ई पिक पहाणी. जो प्रकल्प राज्य शासनाच्या माध्यमातून 2021 मध्ये पूर्ण राज्यांमध्ये राबवण्यास मंजुरी देण्यात आली. मित्रांनो या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी काही नवीन सुधारित मार्गदर्शक सूचना 31 जानेवारी 2023 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करून घेण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये पीक पाणी कशी करायची शेतकरी बांधवांनी पाहणी केल्यानंतर त्याची तपासणी कशा पद्धतीने करायची, जर ईपीक पाहणी केली नाही तर काय होणार, जर एखाद्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली नाही तर ते शेतकऱ्यांची पीक पाहणीची नोंद कोणी करायची, या सर्व माहितीच्या मार्गदर्शक सूचना या शासन निर्णयाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आले आहेत.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

पिकांची नोंदवही E-Peek Pahani

E-Peek Pahani प्रत्येक गावामध्ये शेत जमिनीत घेतलेली पिके आणि त्यांच्या शेत्र दर्शवणारी पिकाची नोंदवही ठेवण्यात येणार आहे. तसेच त्या नोंदवहीमध्ये ती प्रत्येक भूमापन क्रमांक किंवा भूमापन क्रमांकाच्या उपविभागणी आहे नमुना क्रमांक त्यामध्ये स्वतंत्र स्वरूपात ठेवण्यात येणार आहे आणि या नोंदवही मध्ये खातेनिहाय या ई-पीक पाहणी नोंद केली जाणार आहे.

आता नोंदवही मध्ये खालील प्रमाणे नोंदणी करण्याची प्रक्रिया

  • सर्वप्रथम दरवर्षी शेतीमध्ये लागवड केलेली पिके उभे असताना केव्हाही आणि शासनाने वेगवेगळ्या पिकांसाठी ठरवून दिलेल्या तारखेपर्यंत नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याकडून ठरवून दिलेल्या तारखेपर्यंत जमीन मालक किंवा जमिनीतील लागवड करणाऱ्या व्यक्तीने शेतामध्ये लागवड केलेली पिके ही E-Peek Pahaniआज्ञावली मध्ये विहित केलेल्या पद्धतीने आणि शासनाने जारी केलेल्या पद्धतीनुसार नोंद करणे आवश्यक असणार आहे. आणि ज्या त्या हंगामासाठी लागवड केलेली पिके ही शासनाने दिलेल्या माहितीनुसार मोबाईल किंवा इतर कोणत्याही साधनाने आपण नोंदवली जाणार आहे.
  • जमिनीचा मालक किंवा जमिनीत लागवड करणारा जो शेतकरी असेल तो शेतकरी एकाचा तपशिला बरोबर लागवड केलेले क्षेत्र तसेच जलसिंचनाचा जो स्रोत असतो म्हणजेच विहीर किंवा बोरवेल किंवा अन्य कोणते साधन असेल ते तसेच शेताच्या बांधावरील झाडे तसेच कायम पडिक असणारे क्षेत्र E-Peek Pahani अशा शेतातील पायाभूत सुविधा असल्यास शासनाने वेळोवेळी निर्देशित केलेल्या माहितीनुसार याची माहिती नोंदवणे आवश्यक असणार आहे.
  • जमिनीचा मालक किंवा जमिनीत लागवड करणारा व्यक्ती त्यांच्या मार्फत बंगलावरील झाडे किंवा कायम पर क्षेत्र याचे अक्षरांश आणि रेखांश हे जिओ टॅग केलेले छायाचित्र हे ऑनलाईन पद्धतीने अपलोड करणे आवश्यक असणार आहे. E-Peek Pahani

कामाची माहिती – Ativrushti Nuksan Bharpai: शासनाच्या या निर्णयामुळे अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार लवकरच.

  • त्यानंतर जमीन मालक किंवा जमिनीमध्ये लागवड करणारा जो कोणीही व्यक्ती असेल त्याने यामध्ये नोंद केलेले क्षेत्र त्याबाबतचे सत्यतेबाबतचे सुघोषणापत्र या ऑनलाइन पद्धतीमध्ये देणे बंधनकारक असणार आहे. E-Peek Pahani
  • जमिनीमध्ये लागवड करणारा व्यक्ती किंवा जमीन मालक यांनी ई-पीक पाहणी प्रणाली द्वारे नोंदविलेल्या पिकाची माहिती ही माहिती नोंदवल्यापासून 48 तासाच्या आत शासनाने जारी केलेल्या सूचना प्रमाणे दुरुस्त करू शकणार आहे.E-Peek Pahani

अशाच पद्धतीने भरपूर साऱ्या सूचना आहेत त्या सूचना आपण खालील दिलेल्या शासन निर्णयामध्ये पाहू शकतात.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करावे

सर्व शेतकरी बांधवानी, रब्बी हंगामाची E-Peek Pahani ई पिक पाहणीची शासनातर्फे दिनांक 15/02/ 2023 ही मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी जे शेतकरी ई पीक पाहणी करायचे राहिले आहेत त्यांनी कृपया आपल्या शेतातील रब्बी हंगामाची पीक पाहणी करून घ्यावी. शेवटच्या 15 तारखेपर्यंत ई पीक पाहणीची वाट न पाहता आत्ताच ताबडतोब आपल्या पिकाची पीक पाहणी करून घ्यावी. त्यासाठी E-Peek Pahani version 2.6 हे अद्यावत ॲप घ्यावे.

Leave a Comment