Falbag Yojana: फळबाग योजनेचे ऑनलाईन अर्ज पुन्हा सुरू, आता एका पेक्षा जास्त फळपीक लागवड करता येणार.


महाविकास आघाडी सरकारने बंद केलेली स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना (Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana) एकनाथ शिंदे सरकारने पुन्हा सुरू केली आहे. 

2022-23 या वर्षात इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी या योजनेअंतर्गत फळबाग (Falbag Lagvad Yojana) लागवडीचा लाभ घेण्याचा आवाहन जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी रविशंकर सर्वदे यांनी केले. या योजने करता किमान 0.20 हेक्टरचे कमाल 6.0 क्षेत्र असणे आवश्यक आहे. कमल क्षेत्र मर्यादित लाभार्थ्यांच्या इच्छेनुसार एकापेक्षा जास्त फळपीक लागवड करता येईल. या योजनेअंतर्गत पुढील बहुवार्षिक फळपिकांचा आंबा, पेरू, डाळिंब, लिंबू, मोसंबी, संत्रा, सिताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, अंजीर आणि चिकू यांचा समावेश करण्यात आला आहे.

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजनेतून अपात्र असणारे शेतकरी यांना वैयक्तिक लाभ घेता येईल. शेतकऱ्यांच्या स्वतःच्या नावे 7/12 आणि 8 अ चा उतारा असणं आवश्यक आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी (Mahadbt Farmer) संकेतस्थळावर नोंदणी करावी या योजनेअंतर्गत अनुदान मंजूर मापदंडाप्रमाणे ध्येय असल्यामुळे अर्ज करताना शेतकऱ्यांनी सातबारा आणि आठ नुसार क्षेत्र सर्वे नंबर फळ पिकाच नाव प्रकार कलम रोप लागवड अंतराचे परिमाण मीटरमध्ये इत्यादी माहिती शेतकऱ्यांनी अचूक भरावी.

Website Link – https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login


महाडीबीटी पोर्टल (Mahadbt Farmer) सुरू झाल्यापासून योजने अंतर्गत मागील प्राप्त अर्ज तारीख 30 नोव्हेंबर पर्यंत प्राप्त होणारे अर्ज आर्थिक लक्षकांच्या अधिन राहून संगणकीय सोडती द्वारे लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.


अर्ज संबंधी माहिती वेबसाईटवर (Mahadbt) उपलब्ध तसेच अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची संपर्क साधावा. या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी रवीशंकर सर्वदे यांनी केले आहे.

 

माहिती महत्त्वाची वाटली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर नक्की करा.

1 thought on “Falbag Yojana: फळबाग योजनेचे ऑनलाईन अर्ज पुन्हा सुरू, आता एका पेक्षा जास्त फळपीक लागवड करता येणार.”

Leave a Comment