Farmer Loan Waiver: कर्ज माफी प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा, या शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ

Join Telegram Group

farmer loan waiver list|district wise loan waiver list|farmer loan waiver list maharashtra|Shetkari Karmafi|

मित्रांनो शेतकरी कर्जमाफी योजने संदर्भातील एक महत्त्वाचे बातमी आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना (Loan Waiver) 2019 ही योजना सुरू करण्यात आलेली होती. या योजनेसाठी 20000 कोटीची तरतूद देखील करण्यात आली होती. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करून त्यांची केवायसी करून त्यांना पात्र करण्यात आलेले आहे. अशा शेतकऱ्यांचे दोन लाख पर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात आले होते.

या योजनेची प्रक्रिया अंमलबजावणी सुरू असताना बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी Loan Waiver माफ होऊन सुद्धा त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या पीक कर्जाची रक्कम अद्यापही क्रेडिट केलेली नाही. या कारणास्तव बँकेच्या माध्यमातून त्यांना नवीन कर्जही दिले जात नाही. या अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्यामुळे आणि त्यांनी केवायसी केल्यामुळे त्या शेतकऱ्यांना ते कर्ज परतफेड ही करता येत नव्हते.

अशा दुहेरी संकटामध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी जवळपास 600 कोटीचा निधी आवश्यक आहे. अशी माहिती सांगण्यात आलेली आहे. याच्यासाठी अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून 9 मार्च 2023 रोजी 140 कोटी 70 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. यामुळे या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे यादीमध्ये अशा शेतकऱ्यांची नावे आलेली आहेत अशा शेतकऱ्यांची केवायसी झालेली आहे. अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप देखील कर्जमाफीची रक्कम आलेली नाही. अशा शेतकऱ्यांना या निधीमुळे दिलासा मिळणार आहे आणि त्यांना मदत होणार आहे. या रकमेचे वितरण करण्यासाठी सुरू झालेल्या आहे.

या निधीमुळे अशा शेतकऱ्यांची कर्ज खाती नील होऊन त्यांना आता नवीन कर्ज दिले जाईल अशी आशा आहे. बरं साऱ्या जिल्ह्यामध्ये या योजनेअंतर्गत किंवा या अगोदरची योजना छत्रपती शिवाजी महाराज सन्मान निधी योजनेअंतर्गत खूप सारे शेतकरी पात्र झालेले आहेत परंतु त्यांना सुद्धा अद्याप देखील या निधीचा लाभ मिळालेला नाही. अशा शेतकऱ्यांना महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 मध्ये घोषणा करण्यात आलेली आहे. परंतु या घोषणेमधील निधी अद्याप देखील वितरित करण्यात आलेला नाही अशा शेतकऱ्यांना लवकरच निधी वितरित करून त्यांना मदत केली जाईल अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे.

शासन निर्णय डाउनलोड करा

सध्या स्थितीला 140 कोटी 70 लाख रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि काही शेतकऱ्यांना या निधीद्वारे पात्र करण्यात आलेले आहे. उर्वरित शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी संदर्भात काही अपडेट आले तर आपण नक्की घेण्याचा प्रयत्न करू.

Karj Mafi Yojana- शासनाच्या गलथान कारभारामुळे हे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित.

महात्मा फुले कर्जमाफी Loan Waiver योजनेचा असा होणार लाभ

  • बँकेकडून घेतलेल्या कर्जामुळे शेतकऱ्यांची दोन लाखाच्या आत मधील कर्ज माफ केले जाणार आहे.
  • ही योजना सुरू झाल्यामुळे राज्यांमधील बरेच शेतकरी आर्थिक परिस्थितीतून दूर होऊन स्वावलंबी होतील.
  • महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना अंतर्गत दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे.
  • या कर्जमाफीमुळे शेतकरी सक्षम होणार आहे.

राज्य सरकारने घेतलेले या निर्णयामुळे शेतकऱ्यांकडून राज्य सरकारचे स्वागत केले जात आहे या योजनेअंतर्गत शेतकरी कर्जाच्या तणावातून मुक्त होतील आणि जे शेतकरी आत्महत्या चे प्रमाण वाढले आहे ते नक्कीच कमी होईल अशी राज्य सरकारने विश्वास व्यक्त केला आहे.

2 thoughts on “Farmer Loan Waiver: कर्ज माफी प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा, या शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ”

Leave a Comment