Fertilizer Subsidy: खरीप हंगामासाठी खतासाठी 1.08 लाख कोटींच्या अनुदानास मंत्रिमंडळाची मंजुरी, वाचा सविस्तर माहिती

Fertilizer Subsidy: सरकार खतांच्या किमती वाढवणार नाही आणि युरियासाठी 70,000 कोटी रुपये आणि डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) साठी 38,000 कोटी रुपये वाटप करणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी केली. ता. 17 झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरीप हंगामासाठी खतांसाठी 1.08 लाख कोटी रुपयांच्या अनुदानास मान्यता देण्यात आल्याची घोषणा केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी केली. खतांच्या किमतीत वाढ न करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

Fertilizer Subsidy

खरीप हंगामासाठी खतांसाठी 1.08 लाख कोटी रुपयांच्या अनुदानास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सरकार युरियासाठी 70,000 कोटी रुपये आणि डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) साठी 38,000 कोटी रुपये वाटप करणार आहे, असे मांडविया यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयांवर पत्रकार परिषदेत सांगितले.

केंद्रीय रसायन आणि खते मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, भारतात युरियाची वार्षिक मागणी ३२५-३५० लाख टन आहे. त्यांनी पुढे नमूद केले की, देशातील शेतकऱ्यांना वेळेवर खतांची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या वाढलेल्या किमतीचा भार कमी करणे हे आमच्या सरकारसाठी आवश्यक आहे.

Solar Pump Yojana: प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना नवीन अर्ज सुरू, असा करा अर्ज

मागील आर्थिक वर्षात सरकारने खत अनुदानासाठी २.५६ लाख कोटी रुपये खर्च केले होते. मंत्रिमंडळाने इतर खर्चांसह IT हार्डवेअरसाठी उत्पादन-लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेसाठी अर्थसंकल्पात 17,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यास मान्यता दिली आहे.

खत अनुदानासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment