Gai Gotha Yojana: गाय गोठा योजनेमध्ये मोठा बदल, वाचा कोणते बदल झाले | Sharad Pawar Gram Samridhi Yojana

Gai Gotha Yojana शरद पवार ग्राम समृद्धी योजने (Sharad Pawar Gram Samridhi Yojana) अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या गाय गोठा अनुदान योजना 2023 योजनेमध्ये काही बदल झाले आहेत त्या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट आहेत पाहूया त्याविषयी सविस्तर माहिती.

17 मार्च 2023 रोजी एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेऊन या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. मित्रांनो राज्यामध्ये 3 फेब्रुवारी 2021 रोजी एक शासन निर्णय घेऊन महाराष्ट्र राज्यामध्ये ही योजना राबविण्यासाठी मंजुरी देण्यात आली. आणि याच शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत राबवली जाणारी गाय गोठा योजना (Gay Gotha Yojana) यामध्ये जनावरांना खाद्य व्यवस्था व चारा व्यवस्थित टाकण्यात यावा यासाठी व जनावरांचे मल्ले व मूत्र मूल्यवान असल्यामुळे याचा वापर करून सेंद्रिय खताची निर्मिती करता यावी यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक असा गाय गोठा यासाठी शरद पवार ग्रामसमृद्धी योजना अंतर्गत या योजनेला राज्यभर राबविण्यात येत आहे.

Gai Gotha Yojana या योजनेसाठी अकुशल खर्च 6188 रुपये व कुशल खर्च 71 हजार रुपये असे मिळून 77 हजार 188 रुपये एवढे अनुदान या गाय गोठा योजनेसाठी दिले जाते. या योजनेचा लाभ घेत असताना एक महत्त्वाची आट आहे ती म्हणजे लाभार्थ्यांनी या योजनेच्या लाभासाठी जो गोठ्याचा प्रस्ताव दिला जातो त्या प्रस्तावासोबत जनावरांचे टॅगिंग करणे आवश्यक होते. बँकेकडून कर्ज घेऊन किंवा पशुसंवर्धन मार्फत जी काही जनावरे मिळाले असतील त्या संदर्भात या जनावरांना त्या ठिकाणी टॅगिंग करता येते परंतु जनावरांची स्वखर्चाने खरेदी केली असल्यास बऱ्याच लाभार्थ्याकडून त्याचे टॅगिंग केले जात नाही. त्यामुळे या योजनेमध्ये लाभार्थी मोठ्या प्रमाणामध्ये अपात्र होत आहे. या कारणास्तव शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी अडचणी देखील निर्माण होत आहेत.

यासाठीच या Gay Gotha Yojana योजनेमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. शासन निर्णय मध्ये आपण पाहू शकता या अटीच्या ऐवजी आता ग्रामसेवक तांत्रिक सहाय्यक किंवा ग्राम रोजगार सेवक यांनी पंचनामा करून लाभार्थ्याकडे उपलब्ध जनावरांची आकडेवारी प्रमाणित करावी. पंचनामा करताना ग्रामसेवक, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकांपैकी एक किंवा इतर शासकीय कर्मचाऱ्यांपैकी कोणीही एक व्यक्ती हजर असणे आवश्यक असेल. (Gai Gotha Yojana)

Gai Gotha Yojana

अशा प्रकारच्या अटीचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे जनावरांच्या टॅगिंग मुळे जे जनावरे अपात्र केले जात होते. त्यांना आता ग्रामसेवक किंवा ग्रामरोजगार सेवक यांच्या माध्यमातून पंचनामा करून या योजनेचा लाभ घेता येईल.

शासन निर्णय डाउनलोड करा

यामुळे मित्रांनो अतिशय महत्त्वाचा आणि दिलासादायक बदल या योजनेमध्ये करण्यात आले आहे. यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

1 thought on “Gai Gotha Yojana: गाय गोठा योजनेमध्ये मोठा बदल, वाचा कोणते बदल झाले | Sharad Pawar Gram Samridhi Yojana”

Leave a Comment