Garpit Nuksan Bharpai: अवकाळी पाऊस व गारपीट नुकसान भरपाई जाहीर, 23 जिल्ह्यातील 2 लाख 25 हजार शेतकरी पात्र, शासन निर्णय जाहीर

Garpit Nuksan Bharpai: राज्यामध्ये अवकाळी पाऊस व गारपीटने नुकसान झालेल्या राज्यांमधील दोन लाख 25 हजार 147 शेतकऱ्यांना एक अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे.

आज 10 एप्रिल 2023 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून मार्च महिन्यामध्ये अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे (Fund distributed due to unseasonal rain, hailstorm) नुकसानग्रस्त झालेल्या 23 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना वितरण करण्यासाठी एक शासन निर्णय आज दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून निधी वितरित करून या शेतकऱ्यांसाठी दिलासा दिला आहे.

शेतकरी बांधवांनो आपल्याला माहीतच असेल की 4 मार्च ते 8 मार्च या कालावधीमध्ये व 16 मार्च ते 19 मार्च या कालावधीमध्ये शेतकऱ्यांचे गारपीट व अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये (Garpit Nuksan Bharpai) नुकसान झाले होते. या कारणास्तव अवकाळी व गारपीट नुकसानीसाठी या 23 जिल्ह्यांमधील 33% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे (Input subsidy) वितरण करण्याकरता विभागीय आयुक्त नाशिक, अमरावती, संभाजीनगर यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे निधीची मागणी केली होती.

या मागणीनुसार निधीची उपलब्धता करण्यासाठी आज 10 एप्रिल 2023 रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून हा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. याच्यासाठी 177 कोटी 80 लाख 61 हजार एवढी रक्कम करण्यासाठी मंजुरी या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यामधील 2663 शेतकऱ्यांना दोन कोटी 38 लाख 54 हजार रुपयांचे वितरण केले जाणार आहे.

Garpit Nuksan Bharpai List

  • अकोला जिल्ह्यामधील 3651 शेतकऱ्यांना चार कोटी 49 लाख 86 हजार रुपये एवढे निधीचे वितरण केले जाणार आहे.
  • यवतमाळ जिल्ह्यामधील 9302 शेतकऱ्यांना सहा कोटी 61 लाख 33000 एवढ्या रकमेचे वितरण केले जाणार आहे.
  • बुलढाणा जिल्ह्यामधील 7944 शेतकऱ्यांना सात कोटी 92 लाख 23 हजार एवढ्या रकमेचे वितरण केले जाणार आहे.
  • वाशिम जिल्ह्यामधील 2572 शेतकऱ्यांना दोन कोटी 85 लाख 99 हजार एवढे निधीचा वितरण केले जाणार आहे.
  • असे अमरावती विभाग एकूण शेतकरी संख्या 26132 व एकूण निधी 24 कोटी 57 लाख 95 हजार.

Garpit Nuksan Bharpai: उर्वरित जिल्ह्याची संख्या, निधी व शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तर मित्रांनो अशा पद्धतीने गारपीट अवकाळी पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी यामध्ये वितरण केले जाणार आहे. 3 दिवसांपूर्वी मदत व पुनर्वसन विभाग यांच्या माध्यमातून राज्यामधील 1 लाख 99 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे व यांचे पंचनामे झाले असून याची माहिती आपण त्याच्या अगोदरच्या पोस्टमध्ये पाहिली होती. ही मदत वितरित करीत असताना 1 लाख 13 हजार 402 हेक्टर ची मदत वितरित केली गेली आहे. यामुळे उर्वरित 70 ते 80 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान भरपाई ची मदत अद्याप देखील वितरित करण्याचे बाकी आहे.

याचप्रमाणे गेल्या 3 ते 4 दिवसापासून राज्यामध्ये विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. अमरावती जिल्ह्यामध्ये काल व परवा या 2 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. या सर्व बाधित झालेल्या जिल्ह्यामधील (Garpit Nuksan Bharpai) शेतकऱ्यांना व उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच एक शासन निर्णय घेऊन मदतीचा वितरण केले जाईल अशा प्रकारचा एक अंदाज आहे. याबद्दल काही अपडेट आले तर आपण नक्कीच घेण्याचा प्रयत्न करू.

2 thoughts on “Garpit Nuksan Bharpai: अवकाळी पाऊस व गारपीट नुकसान भरपाई जाहीर, 23 जिल्ह्यातील 2 लाख 25 हजार शेतकरी पात्र, शासन निर्णय जाहीर”

Leave a Comment