Karj Mafi Yojana: प्रोत्साहन अनुदानासाठी 1 हजार कोटी रुपये मंजूर, रक्‍कम 2 दिवसांत शेतकऱ्यांना मिळण्याची शक्‍यता

Karj Mafi Yojana महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा फुले शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहन अनुदानापैकी मंजूर ४७०० कोटींपैकी शेवटच्या एक हजार कोटींच्या वितरणास मान्यता देण्यात आली. ही रक्कम आधार प्रमाणीकरण झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांत जमा होण्याची शक्‍यता आहे.

२०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा फुले शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत अल्पमुदतीच्या पीककर्जाची नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाची घोषणा केली होती. मात्र लगेचच कोरोना आल्याने राज्याचा आर्थिक गाडा विस्कळीत झाला. कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदान रक्‍कम वितरण रखडले. Karj Mafi Yojana

Karj Mafi Yojana मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी या आर्थिक वर्षात पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करत असल्याची घोषणा केली होती. दरम्यान, राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर नवीन सरकारने जुळै २०२२ मध्ये ४७०० कोटी रुपयांची तरतूद केली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सप्टेंबर २०२२ मध्ये २५०० कोटी रुपये, दुसर्‍या टप्प्यात ऑक्टोबर २०२२ मध्ये ६५०, जानेवारी २०२३ मध्ये ७०० कोटी रुपये, असे एकूण ३७०० कोटी रुपये वितरित केले होते. त्यानंतर मंजूर रकमेपैकी १ हजार कोटी रुपयांच्या वितरणाची प्रतीक्षा होती. त्यानुसार ही रक्‍कम वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांत ही रक्‍कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

Karj Mafi Yojana

लाभार्थी शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत Karj Mafi Yojana

प्रोत्साहन योजनेत नियमित कर्जफेड रक्‍कम ५० हजार रुपयांच्या वर असेल, तर ५० हजार रुपये अनुदान देण्यात येते. या योजनेसाठी २८ लाख ६० हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी १४ लाख ९३ हजार शेतकरी पात्र ठरले होते. यापैकी १४ लाख ३९ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले. पहिल्या टप्प्यात सात लाख १९ हजार शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले. अजूनही काही शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळाले नसल्याने पुरवणी मागणीत मंजूर झालेली रक्‍कम या योजनेसाठी देण्यात येईल, असे सहकार विभागातील सूत्रांनी सांगितले.

शासन निर्णय डाउनलोड करा

1 thought on “Karj Mafi Yojana: प्रोत्साहन अनुदानासाठी 1 हजार कोटी रुपये मंजूर, रक्‍कम 2 दिवसांत शेतकऱ्यांना मिळण्याची शक्‍यता”

Leave a Comment